आम आदमी पक्षाची झाडू यात्रा
महावाणी - विरेंद्र पुणेकर
०८ ऑक्टोबर २३

    चंद्रपूर: येत्या ११ ऑक्टोबरला आम आदमी पक्ष चंद्रपूरची झाडू यात्रा राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये कोरपणा गडचांदूर व राजुरा या ठिकाणी निघत आहे

    महाराष्ट्र राज्याचे प्रभारी गोपाल इटालिया प्रामुख्याने या झाडावर यात्रेमध्ये सहभागी होणारा असून कोरपणा गडचांदूर व राजुरा मध्ये होणाऱ्या सभांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

    राज्यामध्ये व देशांमध्ये वाढत असलेल्या महागाई बाबत तसेच राज्य सरकार व केंद्र शासन यांच्या शैक्षणिक आरोग्य व रोजगार विषयी चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आक्रोश बाबत ही झाडूयात्रा असून

    दिल्ली व पंजाब मध्ये आम आदमी पक्षाद्वारे ( aam aadmi party ) सफलतेने राबविण्यात येणार्‍या योजना देखील सामान्य जनतेपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहोचविला जाणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व पक्षाचे भावी उमेदवार  श्री सुरज ठाकरे यांनी  सांगितले आहे

    यात्रा दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी राजुर यापासून दुपारी दोन वाजता राजुरा येथून  थेट कोरपणा येथे पोहोचून कोरपणामध्ये  सुरू होणार आहे तेथून यात्रा ही गडचांदूर येथे गांधी चौक व तेथून राजुरा गांधी चौकापर्यंत राहणार आहे व राजुरा गांधी चौक येथे भव्य सभेनंतर यात्रेचे समापन होईल. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये होणार असलेली ही संपूर्ण यात्रा श्री गोपाल इटालिया  ( gopal italiya )यांच्या मार्गदर्शनात व श्री सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे  

    या यात्रेमध्ये विदर्भ संघटन महामंत्री श्री भूषण ढाकुलकर. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री मयूर रायकवार ( mayur rayakwar ) पक्षाचे वरिष्ठ नेते  श्री.सुनील मुसळे  श्री भिवराज सोनी, श्री.  योगेश मुरेकर, श्री योगेश गोखरे, एडवोकेट तब्बसूम, मोहब्बत खान श्री विजय चन्ने, आशिष आगरकर, आशिष कुचनकर, सुनील राठोड, नागेश इटेकर, फिरोज खान, निखिल बजाइत, राहुल चव्हाण, अभिजीत बोरकुटे, अजय टाक, इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने  सामील होणार आहेत. ( Broom Yatra of Aam Aadmi Party ) ( Mahawani ) ( Suraj Thakre ) 

To Top