शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशीमहावाणी - विरेंद्र पुणेकर
२१ सप्टेंबर २३

    चंद्रपूर: माननीय किरण भाऊ पांडव Kiran Pandav पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शेतकरी नेते श्री. नितीन मते Nitin Matte यांनी आपल्या कार्यकर्त्यासह माननीय तहसीलदार वरोरा यांना निवेदन सादर केले. चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक Soybean crop शेतकऱ्यांच्या हातात आलेले असताना अचानक अज्ञात रोगाने सोयाबीन या पिकाला पूर्णता नष्ट केले आहे. मोजाक आणि खोड अळी किंवा पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे कृषी विभागाकडून याविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा काढला होता त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात यावा किंवा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नसेल त्यांच्यासाठी सरकारने सरसकट एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे तसेच या आसमानी व सुलतानी संकटातून शेतकऱ्यांचे रक्षण करून न्याय द्यावाअशी मागणी शेतकरी नेते नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह केली यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच अनुदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी त्यांचे समवेत श्रीकांत  खंगार तालुकाप्रमुख वरोरा व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. (For those farmers who have not taken insurance, the government should give a subsidy of Rs. 50 thousand per acre) ( Mahawani )

To Top