बदली रद्द नकेल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा आपचे AAP नेते सुरज ठाकरे ह्यांच्या इशारा.
२१ सप्टेंबर २३
राजुरा: संदीप बुरडकर हा पोलीस विभागात हवालदार पदावर कार्यरत कर्मचारी मागील अनेक वर्षे राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत होता,परंतु ह्याची राजुरा येथील कारकीर्द कायम वादग्रस्त राहिली,मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ह्या कर्मचार्याने राजुरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अवैध धंद्याचे स्तोम माजवले होते,अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी ह्याचे असलेले मधुर संबंध चर्चेचा विषय होता,एवढेच नव्हे तर हा कर्मचारी केवळ अवैध व्यवसायाला प्रोत्साहनच देत नव्हता तर अवैध व्यवसायात ह्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. कुठलीही परवानगी न देता दुकानांची तपासणी करणे ,पोलिसांच्या कार्यवाहीची माहिती कारवाई पूर्वीच अवैध व्यवसायिकांपर्यंत पोहोचवणे ह्या सारख्या कामांमुळे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक देशमुख The then Sub Divisional Superintendent of Police Deshmukh ह्यांनी हा कर्मचारी पोलीस विभागात काम करण्याच्या लायकीचा नसल्याचा अहवाल दिला.
ह्या सर्व तक्रारींमुळेच ह्या कर्मचाऱ्यांची मध्यंतरी चंद्रपूर वाहतूक विभागात बदली करण्यात आली होती परंतु हा कर्मचारी पुन्हा राजुरा मध्ये परत आला आणि गुन्हे अनव्हेन्शन विभागात रुजू झाला रुजू होताच ह्याने आपले प्रताप दाखवणे सुरू केले एका बताशांकर नावाच्या तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि बेकायदेशीर रित्या आठ दिवस आपल्याजवळ ठेवून घेतला ह्याबाबत तक्रार दिल्यावर आणि पोलीस अधीक्षकानी दम दिल्यावर त्या व्यक्तीचा मोबाईल परत दिला गेला.
सदर कर्मचाऱ्यांवर एकाहून अधिक गुन्हे दाखल असून त्यामुळेच त्याची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती परंतु परत ह्या कर्मचाऱ्यांची राजुरा पोलिस स्टेशन मध्ये बदली करण्यात आली असून ह्याच्या सोबत बदली करण्यात आलेल्या अन्य दोन कर्मचाऱयांना मात्र मूख्यालयात कायम ठेवण्यात आले आहे.
मागील काही वर्षांत राजुरा तालुका हा अवैध व्यावसायिकांच्या आपसातील संघर्षामुळे झालेल्या गोळीबारी सारख्या घटनांनी गाजत असून संदीप बुरडकर Sandip Burdkar सारख्या अवैध व्यावसायिकांचा पालन हार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची राजुरा येथे झालेली बदली ही परिस्थिती आणखी घातक बनवू शकते अश्या परिस्थिती मध्ये ह्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांला राजुरा येथे बदली करविन्यामागे नक्की कुणाचा हात ही विचार करणारी बाब आहे. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांची झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा आठ दिवसानंतर आपण स्वतः उपोषणाला बसू असा इशारा आम आदमी पार्टीचे नेते सुरज ठाकरे ह्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ( Who is behind the transfer of controversial employees to Rajura? ) ( Mahawani ) (Immediately cancel the transfer of controversial police constable Sandeep Burdkar under Rajura Police Station- Suraj Thakre )