न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलीस प्रशासन पैसे देण्यास करतेय टाळाटाळपीडित पोलीस कर्मचाऱ्याची न्यायासाठी श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे धावमहावाणी - विरेंद्र पुणेकर
19 ऑगस्ट २०२३

    

    सविस्तर वृत्त असे की, पोलीस विभागांमधून दिनांक- ३१.०३. २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले पो. हवा. श्री. चंद्रभान शामरावजी तडस यांनी पोलीस विभागामध्ये प्रामाणिकपणे सेवा दिली. परंतु सेवानिवृत्तीच्या आधी यांचा सन २०२० मधील ६ महिन्यांचा (१८२ दिवसांचा) थकीत असलेला पगार बाकी असल्यामुळे त्यांनी चंद्रपूर येथील पोलीस प्रशासनाच्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन वारंवार तोंडी विनंती आणि पत्रव्यवहार देखील केला. त्यानंतरही काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना पगार देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे त्यांनी कंटाळून शेवट न्यायालयाचा मार्ग पत्कारत  मा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल कोर्ट, नागपूर बेंच यांच्याकडे अपील क्र. ४७२/२२ प्रमाणे दाखल केले. यानंतर दिनांक- १०.०१.२०२३ रोजी न्यायालयाने पीडिताच्या बाजूने निकाल देत त्या निकालामध्ये मा. मॅट कोर्ट न्यायाधीश श्री. गिरटकर यांनी केलेल्या आदेशामध्ये पीडिताला  १८२ दिवसांचा पगार देण्यात यावा.! असा स्पष्ट आदेश असताना देखील गैरअर्जदार  श्रीमती रिना जनबंधू मा. अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी उलट पीडितासोबत उद्धटपणे वागणूक देत पीडिताला " आम्ही कोर्टातून कॉपी मागवू त्यानंतर पाहू..! असे उडवा-उडवी चे उत्तर दिल्यानंतर जेव्हा पिडिताने  'मॅडम आठ महिन्याचा कालावधी ओलांडून गेला, मला माझ्या आईची व पत्नीची तब्येत खराब असल्याने मी योग्य उपचार करू शकत नाही आहो..! असे विनंती करताच मा. अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी समस्येचे निवारण करण्याऐवजी अर्जदाराला "आवाज नको..! गेट आउट..! म्हणून त्यांना बाहेर पाठविले. अशा प्रकारे उच्चशिक्षित सभ्य व्यक्ती जेव्हा अश्या उच्च पदावर असताना असभ्यपणे वागून  'आपण जनतेचे सेवक आहोत' याचे भान नसणारी वेक्ती जबाबदार पदावर असताना जेव्हा अश्या प्रकारची उद्धट भाषा, गैर वर्तणूक, असभ्य पणे वागणूक ज्यामध्ये शिष्टाचार कुठेही आढळून येत नाही.. तर अशी व्यक्ती त्या पदाकरिता खरंच योग्य आहे काय..? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण न्यायालयातील आदेशाची प्रत ही आदेश पारित झाल्यानंतर  ऑनलाइन मध्ये अपलोड होत असते जे सर्टिफाइड कॉपी वरिष्ठ अधिकारी तात्काळ ऑनलाइन माध्यमातून तथा पत्र व्यवहारातून पोस्टाद्वारे  प्राप्त करू शकतात. परंतु जाणीवपूर्वक हेतू परस्पर गैरअर्जदार मा. अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांना जणू काही आपल्या खिशातूनच पैसे द्यायचे आहे की काय?? अशा प्रकारे यांची वागणूक अर्जदारांच्या प्रति आढळून आली आहे. अशी वागणूक यांची फक्त या पीडिताशीच नसून चंद्रपुरातील काही जनप्रतिनिधी, सामान्य जनता, अर्जदार, पीडित यांच्याशी याआधी देखील झाल्याच्या काही तक्रारी आहेत. 

सदर प्रकरणांमध्ये गैरअर्जदार 

१) श्रीमती. रिना जनबंधू, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

२) श्री. हनफी, वरिष्ठ लिपिक, पो. अ. कार्यालय, चंद्रपूर 

३) श्रीमती डोंगे मॅडम, वरिष्ठ लिपिक, पो. अ. का. चंद्रपूर

४) श्री. बरडे, कनिष्ठ लिपिक, पो. अ. का. चंद्रपूर. यांच्याकडून अर्जदार त्यांच्याच विभागातील कर्मचारी असून देखील त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी गैर वर्तवणूक करीत पीडिताला स्व हक्काचे पैसे प्राप्त करून देण्याच्याबाबतीत  बेजबाबदारपणे वागणूक दिली. चंद्रपूर पोलीस खात्यामधील ही फार अशोभनीय बाब आहे.

 वरील सर्व प्रकारानंतर या सर्व गोष्टींना कंटाळून अखेर अर्जदारानी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज  ठाकरे यांच्याकडे धाव घेतली तेव्हा श्री. सुरज ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोलीस खात्यामध्ये असभ्यपणे वागणूक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांन विरोधात कायदेशीर कार्यवाही करून पीडीताला त्याच्या हक्काचे पैसे तात्काळ प्राप्त करून देण्याकरिता विनंती केली आहे.

To Top