मृतक वैद्य परिवाराची देवराव भोंगळेनी घेतली भेट

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ ऑगस्ट २३

राजुरा : तीन दिवसांपूर्वी धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथिल रहिवासी निलेश वैद्य, रुपाली वैद्य व चिमुकली मधू वैद्य यांचा ट्रक व दुचाकी भीषण अपघातात मृत्यू झाला यामुळे वैद्य परिवारावर मोठी शोककळा पसरली. यावेळी भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे (Devrao Bhongle) यांनी वैद्य परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी त्यांचे सांत्वन करीत गरज भासल्यास शक्य तिथे मदत करणार असे सांगत मृत कुटुंबियातील आई-वडील, आजी-आजोबा यांची भेट घेऊन वैद्य परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करीत त्यांना आधार दिला.

सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या वैद्य कुटुंबाविषयी नियतीच्या मनात काही वेगळेच होते, समोरून काळ बनून आलेल्या ट्रकने घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैद्य कुटुंबियांवर आघात करीत एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना  काळाच्या पडद्या आड केल्याने अख्खं कुटुंब उध्वस्त केले. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. लहान मुलीसह पती पत्नीचा अपघाती मृत्यू ही चटका लावून जाणारी घटना असून वैद्य परीवारा बरोबरच धोपटाळा, रामपुर वासियायांना मोठा हादरा बसला आहे.

यावेळी देवराव दादा भोंगळे यांच्यासोबत भाजपा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे, (Sunil Udkure) भाजपाचे विनायक देशमुख, दिलीप गिरसावळे, मधुकर नरड, पाला, सामाजिक कार्यकर्ते दीपक झाडे, प्रमोद पानघाटे, पत्रकार प्रा. बी. यू. बोर्डेवार, गणेश बेले, सुरेश साळवे, सागर भटपल्लीवार, साहिल सोळंके, श्रीकृष्ण गोरे, प्रफुल ठाकरे यांची उपस्थिती होती.

To Top