माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तर्फे फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

महावाणी - विरेंद्र पुणेकर 
२७ जुलै २०२३


    राजुरा: महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ काकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिरे,युवा सेना विभागीय सचिव निलेश भाऊ बेलखेडे जिल्हाप्रमुख विक्रांत भाऊ सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तालुका राजुराच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस शिवसेना विधानसभा समन्वयक बबनभाऊ ऊरकुडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुणाल कुडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश भाऊ झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालकर,शहर प्रमुख स्वप्नील मोहरले,तालुका चिटणीस प्रवीण पेटकर,वतन मादर, गणेश चौथले, अतुल खनके, निखिल गिरी, हर्षल व आदी उपस्थित होते


To Top