चंद्रपुरातील लोकप्रिय राम सेतू पुल धसले ६ इंच खाली


करोडोंच्या पुलाला पडल्या भेगा.

महावाणी - विरेंद्र पुणेकर  
25 जुलै २०२३

   चंद्रपूर : चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोटय़वधी रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला राम सेतू  पुल 6 इंच कोसळल्याची धक्कादायक घटना लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.  सदर पुल चंद्रपूरच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्यात आला, ज्यावर 15 दिवसांपूर्वी स्थानिक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चमकोगिरी करीत विद्युत रोषणाई साठी तीन कोटी रुपये खर्च केले.  मात्र एकाच पावसाच्या पाण्याच्या परिणामामुळे त्याची पडझड सहा इंच खाली धसलेले उडानपूल आपल्याला खोलवर विचार करायला भाग पाडणारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राम सेतू  पुलाचा काही भाग हळूहळू कोसळू लागला असून जिवीतहानी होणे नाकारू शकत नाही.  या घटनेबद्दल जनता अत्यंत चिंतित आणि भयभीत आहे. आणि नागरिकांच्या देखील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आम आदमी पार्टीचे युवा नेते मयूर राईकवार यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे ऐतिहासिक राम सेतू पूल खचल्याचा खुलासा केला असून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एकीकडे निवडणुकीत रामाच्या नावाने मते मागायची आणि रामाच्या वास्तूमध्ये भ्रष्टाचार करायचा हे कितपत योग्य. कोटय़वधी रुपये खर्च करून हा पुल बांधण्यात आला असून तो पडल्यानंतर भ्रष्टाचार, कमिशन खोरी करून निक्रॢष्ठ दर्जाचे काम करायचे.  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक राम सेतु पुलीयाला ड्रिम प्रोजेक्ट मानणाऱ्या पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदार कंत्राटदारांवर कार्यवाही करन्याची मागणी आम आदमी पार्टी तर्फे केली जात आहे.

आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी माध्यमाला दिलीलेली माहिती 

    चंद्रपूरच्या सार्वजनिक सुरक्षेबाबत आमची जबाबदारी आहे आणि आम्ही हा विषय गांभीर्याने घेत त्याची चौकशी करण्याची मागणी करतो. 

सदर पुलाच्या भ्रष्टाचाराचा खुलासा करतांना आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ऑटो आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष धुमाळे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर उपाध्यक्ष सुनील सदभय्या, सहसंघटन मंत्री सिकंदर सागोरे, शहर सहसचिव सुधीर पाटील, पवन कुमार प्रसाद, उमेश रहांगडाले आदी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.To Top