पूर्वषा डोहे हत्याकांडात दोन आरोपींना राजुरा पोलीसां कडून अटक.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२४ जुलै २०२३

    राजुरा: काल दुर्दवी घटना राजुरा सारख्या शांतनगरीत घडली बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाज पुन्हा राजुरा वासीयांच्या कानी पडला ह्या गोळीबारा मुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला सदर प्रकरण लल्ली नामक वेक्तीचे काही काळा आधी घडलेल्या आपसी वादाचे होते मागील भांडणाचा क्रोध मनीबाळगून सदर मारेकरी योग्य वेळेची वाट पाहत होते असे बोलण्यात येत आहे. परंतु यात निष्पाप महिलेचा बळी गेला गोळीबार करून पसार झालेल्या मारेकर्यांना बेळ्या घालण्या करिता राजुरा पोलीस तत्काळ सज्ज झाले आणि चार चमूनि सदर प्रकरणात धाव घेतली पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार ज्या दिशे ने मरेकरी पसार झाले होते त्या दिशेने राजुरा पोलिसांनी धाव घेतली यात एक नाबालिक व लवजोतशिंग देवल (19) या दोन आरोपींना जेरबंद करण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे. विशाल नगरगोजे  Dy SP/ Police Inspector Visahl Nagargoje यांच्या मार्गदर्शना खाली समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू  ASP Reena Janbandhu या प्रकरणाची पाहणी करीत आहे. 
To Top