महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अजित पवारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया



लोकवणी- विरेंद्र पुणेकर

(०४ जुलै २०२३)


        पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या बंडखोरीला दोन दिवस झाले आहेत, मात्र अद्याप बंडखोरीबाबतचं चित्र स्पष्ट झालं नाही. याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमागे बहुदा शरद पवारच असतील, अशी शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली. यावेळी त्यांनी याचं कारणंही सांगितलं आहे. अजित पवारांबरोबर गेलेल्या तीन नेत्यांवरही त्यांनी संशय उपस्थित केला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही. हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेणार आहे.


To Top