चंद्रपूर जिल्ह्या शिवसेना पदाधिकारी जाहीर

लोकवाणी - विरेंद्र पुणेकर
(१८ जुलै २०२३)

        चंद्रपूर: माननीय मुख्यमंत्री तथा नेते एकनाथ शिंदे Eknath Shinde साहेब यांचे आदेशाने माननीय संजय जी मोरे Sanjay More साहेब शिवसेना सचिव, खासदार श्री प्रतापराव जाधव Prataprao Jadhav शिवसेना नेते यांचे मुख्य उपस्थितीत श्री किरण भाऊ पांडव Kiranbhau Pandav यांचे सूचनेनुसार व श्री बंडूभाऊ हजारे Bandubhau Hajare सह संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा, श्री नितीन मते Nitin Matte शिवसेना जिल्हाप्रमुख  Shivsena Jilha Pramukh व सौ योगिताताई लांडगे Yogitatai Landge महिला आघाडी जिल्हाप्रमुख, श्री सूर्या अडबाले Surya Adbale युवासेना जिल्हाप्रमुख यांचे विनंतीवरून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र उपजिल्हाप्रमुख पदी श्री डॉक्टर सागर माकोडे, भद्रावती शिवसेना तालुका प्रमुख पदी श्री कमलकांत कळसकर,  तर श्री राजेश डांगे यांची वरोरा शहर प्रमुख पदी  नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर सागर माकोडे यांचा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा मध्ये दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा शिवसेनेला विधानसभा क्षेत्रामध्ये पक्ष वाढी संदर्भात निश्चितच होईल तसेच श्री कमलकांत कळस्कर हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या माध्यमातून भद्रावती तालुका व शहर मध्ये पक्ष वाढ करण्यास विशेष मदत होईल. त्याच प्रमाणे श्री राजेश डांगे Rajesh Dange हे वरोरा शहरातील केबल नेटवर्क व्यवसायीक असून तथा शिवसैनिक असून ते सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून वरोरा शहरांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून आज राजेश डांगे हे नाव वरोरा शहरात सुपरीचीत आहे त्यांची सुद्धा शिवसेना वाढीसाठी विशेष मदत होईल असा विश्वास श्री नितीन मते जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केली. कमलकांत कळस्कर आणि राजेश डांगे यांच्या नियुक्तीने वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिकां मध्ये नव चैतन्य निर्माण झालेले दिसून येत आहे. यावेळी श्री सूर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा शहर प्रमुख भद्रावती, श्री श्रीकांत खंगार तालुका प्रमुख वरोरा, श्री नरेन्द्र नरड तालूका प्रमुख ब्रम्हपूरी, श्री अमोल माकोडे शहर प्रमुख ब्रम्हपूरी, सौ ज्योती ताई लांडगे महीला आघाडी तालुका प्रमुख भद्रावती हे उपस्थित होते


To Top