आपले सरकार महाऑनलाइनचे पोर्टल ठप्प; विद्यार्थ्यांचे कोंडले दाखले

Mahawani



लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२७ जून २०२३)

आपले सरकार महाऑनलाइनचे पोर्टल ठप्प; विद्यार्थ्यांचे कोंडले दाखले

        राज्यात नुकताच दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशासह इतर शैक्षणिक कामासाठी दाखले काढण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यासाठी आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज करीत आहेत. मात्र, मागील पाच दिवसांपासून महाऑनलाइनचे पोर्टल ठप्प पडल्याने विद्यार्थ्यांचे दाखले अडकून पडले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यभरात मागील दिवसांपासून महाऑनलाइनचे पोर्टल ठप्प पडले आहे. यामुळे ऐन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच विद्याव्यांची कोंडी झाली आहे. जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, डोमेसाइल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व दाखल्यासह विविध प्रमाणपत्रांसाठी विद्याथ्र्यांची आपले सरकार सेवा केंद्रात धडपड सुरू आहे. मात्र, पोर्टल ठप्प झाल्याने दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्याचे प्रवेशासाठी अडचण निर्माण झाली आहे. महाऑनलाइन पोर्टल ठप्प झाल्याने पूर्वी सबमिट केलेल्या अजांची स्थिती कळणे कठीण झाले आहे. पुढच्या सवासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत संपण्यापूर्वी दाखले मिळण्याची शक्यता कमी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच दाखले काढण्यापूर्वी अर्ज केल्याची पावती देखील येणे बंध झाले असून विद्यार्थ्यां समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top