गोंडवाना विद्यापीठाचा प्रताप एम.ए. परीक्षेत विध्यार्थ्याने पटकवले शून्य मार्क


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२७ जून २०२३)

        गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महाविद्यालयांतील एम. ए. इंग्रजी दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील एका पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या उन्हाळी परीक्षा मे महिन्यात घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. निकालामध्ये एम. ए. इंग्रजी दुसऱ्या सेमिस्टरच्या प्रथम वर्षाच्या इंग्लिश ड्रामा या ८० गुणांच्या पेपरमध्ये वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयामधील २० विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाले. 

GONDWANA UNIVERSITY GADCHIROLI एम. ए. इंग्रजी विषयांमध्ये दुसऱ्या सेमिस्टरच्या काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याची बाब समोर आली. या संदर्भात काही महाविद्यालयांनी फोनद्वारे तक्रारही केली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल.- डॉ. देवेंद्र झाडे, परीक्षा नियंत्रक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

महाविद्यालयातर्फे पाठविण्यात आलेले अंतर्गत गुण हे गुणपत्रिकेवर अचूक आले. मात्र, लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी काही विद्यार्थ्यांना केवळ शून्य गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शून्य गुणदान पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार आहे. महाविद्यालयाने या संदर्भात तातडीने विद्यापीठाला कळवावे, अशी मागणी आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केली. ब्रह्मपुरी येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी विषयात शून्य गुण मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठाने याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.

To Top