गोवरी परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला पहिल्या पाण्याने रापटर जमीनधस्त.


 

लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

गोवरी नाल्यावरील रपटा खचल्याने राजुरा_गोवरी_कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प

 राजुरा __तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा आला तरीही अपूर्ण असल्याने वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता रपटा मंगळवारी नाल्याला आलेल्या पहिल्याच पावसात खचल्याने राजुरा_गोवरी _कवठाळा या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे परिसरातील शेकडो गावांचा राजुरा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात  जीवघेणी कसरत करावी लागणार आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या  नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी तात्पुरता स्वरूपाचा रपटा नाल्यात तयार करून त्यावरून वाहतूक सुरू होती.मात्र दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक रपटा खचल्याने  राजुरा_गोवरी_कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोवरी गावाजवळील नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती.सबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने पावसाळ्यापूर्वी गोवरी येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते.मात्र पावसाळा सुरू होऊनही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नाल्यातून तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला रपटा नाल्याला आलेल्या पहिल्याच पावसात खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. राजुरा_गोवरी_कवठाळा हा वेकोली परिसरातून जाणारा मुख्य मार्ग आहे.या मार्गावर असलेल्या गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही.त्याचा मोठा फटका परिसरातील गावांना बसला आहे.मंगळवारी आलेल्या पहिल्याच पावसात गोवरी गावाजवळील नाल्यावर बांधण्यात आलेला तात्पुरता रपटा  वाहून गेल्याने गोवरी परिसरातील अनेक गावांचा राजुरा शहराशी संपर्क तुटला आहे. 

पुलाअभावी नागरिकांची जीवघेणी कसरत......

गोवरी गावाजवळील नाल्यावरील जुना झालेला पुल तोडून याठिकाणी पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे.मात्र पावसाळा आला तरीही पुलाचे काम अजूनही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. पुलाच्या बांधकामाला बराच उशीर झाल्याने आता पावसाळ्यात गोवरी परिसरातील अनेक गावांचा राजुरा शहराशी संपर्क तुटला आहे.


To Top