महावितरणचे वाकलेले वीज खांब शेतकऱ्यांचा करणार का घात? वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार : वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष




लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(26 जून २०२३)

        राजुरा तालुक्यातील चिडशी येथील महिला शेतकरी मालू गौरीहर कोंगरे यांच्या शेतात गेल्या सहा महिन्यांपासून वीज खांब वाकले आहेत. अशी स्थिती तालुक्यातील अनेक शेतांमध्ये आहे. आता पुन्हा वादळी पावसात ते खालीच कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतात हंगाम करताना कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अनेकदा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सूचना देऊन वीज खांब सरळ करून देण्याची विनंती केली. मात्र, राजुरा येथील वीज वितरण कार्यालयात वारंवार चकरा मारूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे वीज खांबासोबत संपूर्ण लाइनच भुईसपाट होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळा तोंडावर आला असताना महावितरणचे अधिकारी याबाबत गांभीर नसल्याने संताप व्यक्त

राजुरा तालुक्यातील घिडशी येथील महिला शेतकरी मालू गौरीहर कोगरे यांच्या शेतातून मोटार पंपाला वीजपुरवठा करणारी वीज लाइन गेली आहे. परंतु मागील सहा महिन्यांपूर्वी आलेल्या वादळाने यांच्या शेतातील वीज खांब वाकले आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी या वीज खांबावरील वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वीज खांब वाकल्याने वादळी पावसाने वीज खांब केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती तालुक्यातील अनेक शेतशिवारात दिसून येते. अनेक ठिकाणी खांब वाकलेले आहेत, तर कुठे तारा लोंबकळलेल्या आहेत. त्यामुळे या

To Top