Wirur Police Station | विरूर पोलीस ठाण्यातच खाकीचा धिंगाणा!

Mahawani™
0
Police station cartoon depicting a visibly intoxicated police constable causing a disturbance, arguing with colleagues, and carrying a large sharp sattur at his waist inside Wirur Police Station.

मद्यप्राशनाच्या अवस्थेत सहकाऱ्यांशी हुज्जत, आरडाओरड अन कमरेला धारदार सत्तूर

Wirur Police Station | विरूर | कायद्याची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस ठाणेच जर अंतर्गत गोंधळाचे केंद्र बनले, तर पोलीस यंत्रणेच्या शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विरूर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी सकाळी घडलेल्या एका प्रकाराने नेमका हाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कर्तव्यावर आलेल्या पोलीस अंमलदाराने मद्यप्राशनाच्या अवस्थेत सहकाऱ्यांशी हुज्जत, आरडाओरड आणि त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला असून त्याहून गंभीर बाब म्हणजे त्यांच्या कमरेला सुमारे नऊ इंच लांबीचे धारदार सत्तूर आढळून आला आहे.

Wirur Police Station

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मद्यप्राशनाच्या अवस्थेत पोलीस अंमलदार Manoj Sunil Dubey हे विरूर पोलीस ठाण्यात आले. ठाण्यात दाखल होताच त्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू करून उपस्थित कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत पोलीस ठाण्याच्या दरवाजा जोरजोरात आपटण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून PSI Shyamsundar Suryavanshi यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुबे यांनी सहकाऱ्यांचे म्हणणे न ऐकता त्यांच्या अंगावर धावून त्यांच्याशी वाद घालत.

Wirur Police Station

याच गोंधळादरम्यान त्यांच्या कमरेला धारदार शस्त्र असल्याचे पोलीस अंमलदार Avinash Bhimrao Borule यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत दुबे यांची अंगझडती घेण्यात आली. या झडतीमध्ये त्यांच्या कमरेला लांब व तीक्ष्ण पाते असलेला लोखंडी सत्तूर आढळून आला. या सत्तूरचे पाते सुमारे नऊ इंच लांब आणि अडीच इंच रुंद असून, पंचांसमक्ष ते जप्त करण्यात आले.

Wirur Police Station

या घटनेचे गांभीर्य केवळ धारदार शस्त्र जप्त झाल्यापुरते मर्यादित राहत नाही. शस्त्रासह पोलीस ठाण्यात दाखल झालेली व्यक्ती सामान्य नागरिक नसून पोलीस दलातील कर्मचारी असल्याने पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शिस्तीचा आणि नियंत्रण यंत्रणेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारीच कर्तव्याच्या ठिकाणी अशा अवस्थेत येत असेल, सहकाऱ्यांशी वाद घालत असेल आणि त्याच्याकडे धारदार शस्त्र आढळत असेल, तर या संपूर्ण प्रकाराकडे केवळ वैयक्तिक वाद म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही.

Wirur Police Station

या प्रकरणी विरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२११/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ४ व २५, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ८५(१) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १४५(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास API Rajendra Gaikwad यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, गुन्हा नोंदविण्यापलीकडेही काही मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतात. पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्याच्या ठिकाणी धारदार सत्तूर घेऊन येण्याची परिस्थिती का निर्माण झाली? त्याच्याकडे असे शस्त्र का होते? आणि पोलीस ठाण्यातील परिस्थिती इतकी चिघळेपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रण यंत्रणेने नेमकी काय भूमिका बजावली?

Wirur Police Station

या प्रश्नांची उत्तरे केवळ संबंधित कर्मचाऱ्यावरील कारवाईपुरती महत्त्वाची नाहीत. पोलीस ठाणे हे नागरिकांच्या सुरक्षिततेचे ठिकाण आहे. तेथेच धारदार शस्त्रासह गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर अंतर्गत शिस्त, शस्त्रनियंत्रण, कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी या सर्व बाबींची स्वतंत्रपणे छाननी होणे आवश्यक ठरते.

Wirur Police Station

खाकी वर्दी ही कायद्याच्या अधिकाराचे प्रतीक आहे; त्या अधिकारासोबत शिस्त आणि जबाबदारीही तितकीच अनिवार्य आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगारी कारवाईसोबतच पोलीस विभागांतर्गत शिस्तभंगाची कारवाई, घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी आणि अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना याकडेही गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे.


What happened at Wirur Police Station?
A police constable allegedly created a disturbance at Wirur Police Station, argued with colleagues and behaved aggressively.
What was found during the police constable's search?
Was a case registered in the incident?
Yes. Case No. 0211/2026 was registered under relevant provisions of the Arms Act, Maharashtra Prohibition Act and Maharashtra Police Act.
Who is investigating the case?
The investigation has reportedly been assigned to Assistant Police Inspector Rajendra Gaikwad.


#MahawaniNews #VeerPunekarReport #WirurPoliceStation #Wirur #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #PoliceNews #PoliceIncident #PoliceStation #PoliceDepartment #PoliceAction #PoliceCase #LawAndOrder #CrimeNews #CrimeReport #BreakingNews #LatestNews #MaharashtraPolice #PoliceInvestigation #PoliceDiscipline #PoliceAccountability #PublicSafety #SharpWeapon #WeaponCase #ArmsAct #ProhibitionAct #PoliceNewsMaharashtra #VidarbhaNews #Vidarbha #Rajura #RajuraNews #ChandrapurPolice #CrimeInMaharashtra #NewsUpdate #NewsAlert #LocalNews #MarathiNews #InvestigativeJournalism #GroundReport #Journalism #NewsReport #MaharashtraUpdates #PoliceActionMaharashtra #LawAndOrderMaharashtra #CrimeInvestigation #ViralNews #TrendingNews #MaharashtraUpdates #Mahawani

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top