पापा जाधव हत्येत वापरलेल्या पिस्तुलासह तीन कट्टे जप्त; शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा साठा असल्याचा संशय, नागरिकांचा सुरक्षेवरून संतप्त सवाल
Rajura Firing | राजुरा | पापा जाधव हत्याकांडाच्या तपासात आतापर्यंत तब्बल चार देशी कट्टे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. हत्येत वापरण्यात आलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून, आरोपींच्या माहितीवरून रेल्वे लाईनलगतच्या झुडपातून आणखी दोन देशी कट्टे, तर आरोपीच्या मित्राच्या घरातून आणखी एक देशी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या जप्तीने राजुरा शहरातील बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या उपलब्धतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
Rajura Firing
Papa Jadhav हत्येप्रकरणी करण बाविस्कर आणि करण मेकलवार यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याची त्यानंतर परवेश शेख व कार्तिक खामणकर यांच्यासह अन्य संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, चार देशी कट्टे पोलिसांच्या हाती लागणे ही बाब पोलिसांच्या यंत्रणेलाच आरसा दाखवणारी आहे. ही शस्त्रे राजुरा शहरात आली कशी? त्यांचा पुरवठा करणारे कोण? या शस्त्रांबाबत पोलिसांच्या गुप्तवार्ता यंत्रणेला पूर्वकल्पना होती का? आणि शहरात अशाच प्रकारची आणखी किती बेकायदेशीर अग्निशस्त्रे फिरत आहेत?
Rajura Firing
या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पोलिसांनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. एका हत्येच्या तपासातून चार देशी कट्टे बाहेर येत असतील, तर हा केवळ आरोपींच्या अटकेचा विषय राहात नाही; राजुरा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कार्यक्षमतेचा थेट प्रश्न बनतो. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे ही पोलिसांची कर्तव्यपूर्ती असली, तरी अशा शस्त्रांचा शहरात प्रवेश रोखणे आणि त्यांचा माग आधीच घेणे ही पोलिस यंत्रणेची प्रतिबंधात्मक जबाबदारी नाही का?
Rajura Firing
हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना, जुन्या वैमनस्यापासून व्यवसायिक संबंधांपर्यंत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, तपास कोणत्याही एका दिशेपुरता मर्यादित न ठेवता जप्त झालेल्या प्रत्येक शस्त्राचा स्रोत आणि त्यामागील साखळी शोधणे गरजेचे आहे. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा, जर शहरात अग्निशस्त्रे सापडत राहणार असतील? त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
Rajura Firing
पापा जाधव हत्येनंतर पुन्हा गोळीबार होण्याची शक्यता असल्याची भीती राजुरावासी व्यक्त करीत आहेत. ही भीती पोलिसांनी गांभीर्याने घेऊन बेकायदेशीर शस्त्रांविरोधात विशेष मोहीम, संवेदनशील भागात प्रभावी गस्त आणि संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईबाबत कोणती ठोस पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करणे आता अपरिहार्य आहे. चार कट्टे जप्त करून तपास संपत नाही; उलट, राजुरात अग्निशस्त्रांचा हा प्रवाह सुरू कुठून झाला, याचा शोध घेणे हीच पोलिसांची खरी परीक्षा आहे.
How many country-made pistols have been seized in the Rajura firing case?
Where were the additional weapons recovered?
What is known about the weapon used in Papa Jadhav’s murder?
What questions has the recovery of four pistols raised?
#RajuraCourtFiring #RajuraFiring #PapaJadhav #PapaJadhavMurder #RajuraNews #RajuraCrime #RajuraPolice #ChandrapurNews #ChandrapurCrime #MaharashtraCrime #CountryMadePistol #IllegalArms #ArmsSeizure #GunCrime #ShootingCase #MurderCase #CrimeInvestigation #PoliceInvestigation #LawAndOrder #PublicSafety #RajuraBreakingNews #ChandrapurBreakingNews #MaharashtraBreakingNews #BreakingNews #CrimeNews #CrimeAlert #RajuraUpdates #ChandrapurUpdates #MaharashtraNews #MarathiNews #VidarbhaNews #VidarbhaCrime #IllegalWeapons #PoliceAction #GunSeizure #FirearmCrime #RajuraCrimeNews #LatestRajuraNews #LatestChandrapurNews #RajuraToday #ChandrapurToday #CrimeInMaharashtra #MaharashtraPolice #LawAndOrderMaharashtra #NewsUpdate #InvestigativeJournalism #MahawaniNews #VeerPunekarReport #CrimeReport #Justice
.png)

.png)