Rajura Property Fraud | ज्येष्ठ महिलेच्या तब्बल पाच कोटींच्या संपत्तीवर डल्ला?

Mahawani
0
Rajura Property Fraud case press conference featuring former MLA Prabhakarrao Mamulkar's widow Sumantai Mamulkar, who alleges a ₹5 crore property grab by relatives, with journalists and family members addressing the media in Rajura, Maharashtra.

माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नीची पाच जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार; राजुरात खळबळ

Rajura Property Fraud | राजुरा | विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांनी आपल्या निकटवर्तीय नातेवाईकांसह पाच जणांविरुद्ध केलेल्या गंभीर फसवणुकीच्या आरोपांमुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. उतारवयात आधार म्हणून घरात ठेवलेल्या सख्ख्या बहिणीच्या मुलानेच विश्वासाला तडा देत सुमारे पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप त्यांच्या लेखी तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणात फौजदारी कारवाईसह संपत्ती परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajura Property Fraud

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच Rajura Police ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, दिवंगत Prabhakarrao Mamulkar यांच्या निधनानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने सुमनताई मामुलकर यांनी आपल्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते व त्याची पत्नी शिल्पा भुते यांना मदतीसाठी आपल्या घरी राहण्यास ठेवले होते. कालांतराने घरातील सर्व आर्थिक व प्रशासकीय व्यवहार अभिजित भुते याने हाताळण्यास सुरुवात केली. पेन्शनची रक्कम काढण्यापासून विविध व्यवहारांपर्यंत सर्व नियंत्रण त्याच्याकडे गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Rajura Property Fraud

तक्रारीनुसार, २३ मे २०२५ रोजी "जमीन खरेदी करायची आहे" असे सांगून सुमनताई मामुलकर यांना दुय्यम निबंधक कार्यालय, राजुरा येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी Abhijit Bhute, शिल्पा भुते यांच्यासह आशिष नलगे, Baban Bhute आणि धनराज चिंचोलकर उपस्थित होते. याच दिवशी त्यांच्या नावावरील विविध मालमत्तांबाबत तब्बल तीन विक्रीपत्रे, अनेक बक्षीसपत्रे तसेच इतर दस्तऐवजांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारांद्वारे अंतरगाव येथील शेती, सुबई येथील वसतिगृह, रामनगर कॉलनीतील निवासी घर, सुबई येथील जागा, विविध शेतजमिनी आणि इतर मालमत्ता संबंधित व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Rajura Property Fraud

तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या तपशीलानुसार, २३ मे २०२५ रोजीच विविध बक्षीसपत्रे व अधिसपत्रांच्या माध्यमातून अनेक मालमत्ता अभिजित भुते, Shilpa Bhute, आशिष नलगे आणि Dhanraj Chincholkar यांच्या नावावर हस्तांतरित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या मालमत्तांमध्ये राजुरा येथील निवासी घर, सुबई येथील जुने वसतिगृह, शेतजमिनी, ग्रामपंचायत क्षेत्रातील जागा तसेच अंतरगाव येथील कृषी मालमत्तांचा समावेश असल्याचे दस्तऐवजांत दिसून येते. संबंधित व्यवहारांमध्ये दर्शविण्यात आलेल्या किंमती आणि प्रत्यक्ष बाजारमूल्य यात मोठी तफावत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

Rajura Property Fraud

"मला खोटी माहिती देऊन जमीन खरेदीसाठी नेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, माझ्याच नावावरील मालमत्ता इतरांच्या नावावर करून माझी फसवणूक करण्यात आली. वयाच्या ८४व्या वर्षी मला बेघर करून माझी संपत्ती हडपण्यात आली आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून माझी संपत्ती परत मिळवून द्यावी."
— श्रीमती सुमनताई मामुलकर

Rajura Property Fraud

या प्रकरणाने केवळ फौजदारी स्वरूपाचे प्रश्नच निर्माण केले नसून ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही गंभीर कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. सुमनताई मामुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ मधील कलम ५ व २३ अंतर्गतही उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, राजुरा यांच्याकडे अपील दाखल केले आहे. या अर्जाची दखल घेत संबंधित प्राधिकरणाने अभिजित भुते, शिल्पा भुते, Ashish Nalge, धनराज चिंचोलकर आणि बबन भुते यांना नोटीस बजावत त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. नोटिशीनुसार, संबंधित पक्षांनी निर्धारित तारखेला आपली बाजू मांडावी, अन्यथा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Rajura Property Fraud

कायदेतज्ज्ञांच्या मते, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाकडून फसवणूक, दबाव, चुकीची माहिती किंवा विश्वासाचा गैरफायदा घेऊन मालमत्तेचे हस्तांतरण करून घेतल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यास अशा व्यवहारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत अशा हस्तांतरणांचे पुनरावलोकन करून ते रद्द करण्याची तरतूदही कायद्यात उपलब्ध आहे. त्याचबरोबर फसवणूक, विश्वासघात किंवा बनावटपणाचे स्वरूप आढळल्यास संबंधित भारतीय दंड संहितेतील तसेच लागू असलेल्या विद्यमान फौजदारी कायद्यांनुसारही कारवाई होऊ शकते.

Rajura Property Fraud

दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे Sumantai Mamulkar यांनी पोलीस व महसूल प्रशासनाकडे केलेल्या लेखी तक्रारींवर आधारित असून, संबंधित आरोपींकडून याबाबतची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, एका माजी आमदारांच्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला स्वतःच्या मालमत्तेसाठी न्यायालये आणि पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावावे लागत असल्याची बाब राजुरा तालुक्यात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे.


What is the Rajura Property Fraud case about?
Who has been accused in the complaint?
The complaint names Abhijit Bhute, Shilpa Bhute, Ashish Nalge, Baban Bhute, and Dhanraj Chincholkar for allegedly deceiving the complainant in property transactions.
What legal action has the complainant taken?
She has filed a police complaint and also approached the Sub-Divisional Officer under the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007, seeking restoration of her property.
Has any court or authority issued notices in the matter?
Yes. The Sub-Divisional Officer, Rajura, has issued notices to the respondents and directed them to appear for proceedings under the Senior Citizens Act.


#RajuraPropertyFraud #Rajura #Chandrapur #Maharashtra #PropertyFraud #PropertyDispute #SeniorCitizen #SeniorCitizenRights #Justice #LegalNews #BreakingNews #CrimeNews #FraudCase #RealEstate #GiftDeed #SaleDeed #PropertyScam #PoliceComplaint #Investigation #ExMLA #CongressLeader #PrabhakarraoMamulkar #SumanMamulkar #RajuraPolice #ChandrapurPolice #MaharashtraNews #LandDispute #CivilDispute #LegalRights #Inheritance #PropertyTransfer #SubRegistrar #LawAndJustice #PublicInterest #CrimeAlert #IndianLaw #ElderAbuse #FinancialFraud #CourtCase #LegalAction #JusticeForSeniorCitizens #NewsUpdate #TopStory #TrendingNews #IndiaNews #ViralNews #Exclusive #Breaking #Headlines #LatestNews #MahawaniNews #VeerPunekarReport #RajuraNEws #RajuraPolice

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top