धाबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी अटकेत
Dhaba Police | चंद्रपूर | जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जंगल परिसरातून उच्चदाब विद्युत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा अवघ्या पाच दिवसांत पर्दाफाश करण्यात धाबा पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. तब्बल २३ लाख ८८ हजार रुपयांच्या 19/33 KV हायटेंशन पॉवर केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला माल, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईलसह एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण आणि जंगल भागात सुरू असलेल्या पायाभूत वीज प्रकल्पांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या गंभीर गुन्ह्याचा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षण श्री सुबोध वंजारी यांनी छडा लावून प्रभावी तपास कौशल्याचे दर्शन घडविले आहे.
Dhaba Police
या प्रकरणात पोलीस स्टेशन धाबा येथे अप. क्र. ४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी समीर रमेश डिवरे Sameer Ramesh Divare (वय ४७), रा. सोनेगाव, नागपूर हे DUSKLINE INFRASTRUCTURES PRIVATE LIMITED, नागपूर या खाजगी कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सदर कंपनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसाठी नव्या विद्युत वाहिन्या उभारण्याचे काम करीत असून, गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली-वटराणा जंगल परिसरात भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू होते.
Dhaba Police
कंपनीने सन २०२३ मध्ये मौजा गोजोली येथील सुकवासी फाटा परिसरात 19/33 KV HT POWER CABLE चे दोन मोठे ड्रम ठेवले होते. प्रत्येक ड्रमचे वजन सुमारे ७१५० किलो असून, त्याची किंमत सुमारे ११ लाख ९४ हजार १५२ रुपये इतकी होती. दि. ११ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ही महागडी हायटेंशन केबल चोरी करून नेल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीकडून धाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली होती.
Dhaba Police
उच्चदाब विद्युत केबल ही केवळ महागडी धातू नसून राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधेचा अत्यंत संवेदनशील भाग मानले जाते. अशा प्रकारच्या साहित्याची चोरी ही केवळ मालमत्तेविरोधातील गुन्हा राहत नाही, तर सार्वजनिक वीजपुरवठा, शासकीय प्रकल्प आणि औद्योगिक सुरक्षेवर थेट परिणाम करणारी बाब ठरते. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने पाहिले.
Dhaba Police
नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, हालचालींचा मागोवा आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.
Dhaba Police
या प्रकरणात राकेश जागेश्वर भोयर Rakesh Jageshwar Bhoyar (वय ३४), ज्योतीष प्रभू प्रसाद (वय ३९), अभिनयकुमार रामलक्षण प्रसाद (वय २९), हरिप्रसाद श्यामजी उईके (वय ३४) आणि दिपक बेकर उईके (वय २७) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी काही जण ठेकेदारी व्यवसायाशी संबंधित असून काही मजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना ६ मे २०२६ रोजी पहाटे अटक करण्यात आली.
Dhaba Police
तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली HT POWER CABLE प्रत्येकी ५०० मीटर प्रमाणे जप्त करण्यात आली. याशिवाय गुन्ह्यात वापरलेले MH-34/BF-7907 क्रमांकाचे हायड्रा क्रेन वाहन, MH-49/CS-7340 क्रमांकाची होंडा सिटी कार, दोन आयशर वाहने, तसेच आरोपींकडील विविध मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये तब्बल २० लाख रुपयांची दोन वाहने, १८ लाख रुपयांची कार आणि १० लाख रुपयांचे हायड्रा वाहन समाविष्ट आहे. या कारवाईमुळे संघटित पद्धतीने कार्य करणाऱ्या चोरीच्या जाळ्याचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे.
Dhaba Police
विशेष म्हणजे, जंगल परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर केबल चोरी करून ती वाहून नेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि वाहने वापरण्यात आली होती. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांवरून आरोपींनी चोरी केलेला माल वाहतूक करून अन्यत्र विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Dhaba Police
या प्रकरणात केवळ चोरीचाच मुद्दा नसून, शासकीय आणि सार्वजनिक हिताच्या पायाभूत कामांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांची वाढती घुसखोरीही समोर आली आहे. जंगल आणि दुर्गम भागात साठवून ठेवलेल्या सार्वजनिक प्रकल्पांच्या साहित्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यभरात विद्युत केबल, ट्रान्सफॉर्मर, लोखंडी साहित्य आणि तांबे चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, अशा टोळ्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक यंत्रणेलाच लक्ष्य करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Dhaba Police
धाबा पोलिसांनी अत्यंत कमी कालावधीत गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली असली, तरी या टोळीमागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चोरी केलेली केबल कुठे विकली जाणार होती, त्यामागे स्क्रॅप माफिया किंवा औद्योगिक अवैध व्यवहारांचे जाळे आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, ८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dhaba Police
या संपूर्ण कारवाईत सपोनि सुबोध वंजारी, पोअ प्यारेलाल देव्हारे, पोअ श्रावण कुत्तरमारे, चापोअ रामेश्वर पाल आणि पोअ गजानन तुरेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धाबा पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांना स्पष्ट संदेश गेला असून, सार्वजनिक संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
What was stolen in the Chandrapur cable theft case?
How many accused were arrested by Dhaba Police?
What total property was seized during the police action?
How quickly did Dhaba Police solve the case?
#DhabaPolice #ChandrapurCrime #HTCableTheft #PowerCableTheft #PoliceAction #MaharashtraPolice #CrimeNews #BreakingNews #Chandrapur #Gondpipri #ElectricCableTheft #HTPowerCable #PoliceInvestigation #CrimeUpdate #IndianPolice #MaharashtraNews #CableTheftCase #HighVoltageCable #InfrastructureCrime #CrimeAlert #PoliceSuccess #Raid #Arrested #HydraVehicle #HondaCity #AetherVehicle #StolenProperty #PublicInfrastructure #ElectricityProject #UndergroundCable #BharatiyaNyayaSanhita #BNS2023 #LawAndOrder #CrimeReporter #Nagpur #Rajura #PoliceOperation #CrimeNetwork #TechInvestigation #SeizedProperty #ForestAreaCrime #UtilityTheft #BreakingMaharashtra #PoliceDepartment #ChandrapurPolice #OrganizedCrime #IndiaNews #LatestNews #MahawaniNews #CrimeExpose #SubodhWanjari #MahawaniNews #VeerPunekarReport #DhabaNews #GondpipariNews #ChandrapurPolice
.png)

.png)