कौटुंबिक वाद, पूर्वीच्या आत्महत्येच्या प्रयत्नांचा गंभीर धागा उघड; चार वेळा विषप्राशन करूनही वाचलेला अक्षय उईके अखेर मृत्यूच्या विळख्यात
Rajura Suicide Case | राजुरा | शहरातील सोनिया नगर परिसरात गुरुवारी (दि. १६ एप्रिल २०२६) सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ३० वर्षीय अक्षय कैलास उईके याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सम्राट लॉन, राजुरा येथे स्वयंपाकी म्हणून काम करणारा उईके हा आपल्या कुटुंबाचा कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी, आई-वडील असा मोठा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rajura Suicide Case
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी घरात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद शांत करण्यासाठी पत्नी, आई आणि दोन मुली काही काळासाठी घराबाहेर गेल्या होत्या. या दरम्यान, एकटाच असलेल्या अक्षयने गळफास घेऊन जीवन संपवले. कुटुंबीय परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
Rajura Suicide Case
या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि दुर्लक्षित बाजू म्हणजे, मृत अक्षय उईके याने यापूर्वीही तब्बल चार वेळा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी तो थोडक्यात वाचला, मात्र या पुनरावृत्तीने त्याच्या मानसिक स्थितीबाबत आणि कौटुंबिक तणावाच्या स्वरूपाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. इतक्या वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही संबंधित यंत्रणांनी पोलीस, आरोग्य विभाग किंवा समाजकल्याण विभाग त्याच्यावर कोणतीही समुपदेशनात्मक किंवा वैद्यकीय हस्तक्षेपाची ठोस कार्यवाही केली का, हा मूलभूत प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Rajura Suicide Case
कौटुंबिक वाद हा आत्महत्येचा एक कारणीभूत घटक मानला जात असला, तरी त्यामागील खोल मानसिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. उईकेसारख्या सामान्य कामगार वर्गातील व्यक्तींना मानसिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध नसणे, तणाव व्यवस्थापनाची कमतरता आणि सामाजिक आधार यंत्रणेचा अभाव ही परिस्थिती अधिकच गंभीर बनवते.
Rajura Suicide Case
या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा अन्य गुन्हेगारी बाबी आहेत का, याचीही चौकशी अपेक्षित आहे. कायद्यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त करणे हा दंडनीय गुन्हा असल्याने, जर अशा प्रकारचा कोणताही पुरावा समोर आला, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपरिहार्य ठरेल.
Rajura Suicide Case
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक अपयशाचे आणि समाजाच्या संवेदनशून्यतेचेही द्योतक आहे. वारंवार आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांच्यावर तातडीने समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि सामाजिक पुनर्वसनाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. अन्यथा, अशा घटना थांबवणे केवळ कागदी घोषणा ठरतात.
Rajura Suicide Case
राजुरातील ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, मानसिक आरोग्य हा केवळ वैयक्तिक विषय नसून तो सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनाने या घटनेची केवळ चौकशी न करता, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस आणि उत्तरदायी धोरणे राबवणे ही काळाची गरज आहे.
Who was Akshay Uike in the Rajura suicide case?
What was the reported cause behind the suicide?
Did the victim attempt suicide earlier?
What action have the police taken in this case?
#Rajura #RajuraNews #SuicideCase #BreakingNews #MaharashtraNews #Chandrapur #IndiaNews #AkshayUike #MentalHealth #DepressionAwareness #FamilyDispute #CrimeNews #LocalNews #GroundReport #Journalism #Investigation #SocialIssue #PublicConcern #RuralIndia #WorkingClass #HumanStory #Justice #PoliceInvestigation #SuicidePrevention #MentalHealthMatters #IndianSociety #NewsUpdate #TragicIncident #Awareness #MediaReport #RealStory #PublicHealth #Crisis #CommunityNews #DailyNews #NewsAlert #LatestNews #IndiaToday #SocialJustice #Accountability #Truth #FieldReport #Exclusive #NewsAnalysis #BreakingStory #SensitiveIssue #LawAndOrder #Maharashtra #RajuraCity #ChandrapurNews #MahawaniNews #VeerPunekarReport #ChandrapurNews #MHNews #RajuraPolice
.png)

.png)