तलाठी दीपक शेळके यांनी कारवाई केल्याचा दावा; मात्र जप्तीची अधिकृत नोंद, जप्त ट्रॅक्टरांचा ठावठिकाण्याचे अद्याप गूढ
Rajura Illegal Sand | राजुरा | तालुक्यात अवैध रेती/वाळू तस्करीविरोधातील कारवाई पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. साजा देवाडा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) दीपक शेळके यांनी (दि. २०) रोजी देवाडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहें. मात्र, या कारवाईनंतर सर्वात मूलभूत आणि कायदेशीर बाब जप्तीची नोंद अद्याप कुठल्याही अधिकृत नोंदवहीत किंवा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयात दिसून येत नाही. त्यामुळे “कारवाई झाली तरी ट्रॅक्टर गेले कुठे?” हा प्रश्न आता केवळ स्थानिकांचा नाही, तर प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच थेट बोट ठेवणारा ठरत आहे.
Rajura Illegal Sand
घटनाक्रम पाहता, अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाला स्पष्ट अधिकार आहेत. कारवाईदरम्यान जप्त केलेले वाहन तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयाच्या नियंत्रणाखाली ठेवणे, त्याचा पंचनामा नोंद करणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे ही अनिवार्य कार्यपद्धती आहे. मात्र, सदर प्रकरणात या सर्व प्रक्रियांना धाब्यावर बसवण्यात आल्याचा संशय निर्माण होत आहे.
Rajura Illegal Sand
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही ट्रॅक्टर घटनास्थळावरून हटवण्यात आले; पण ते अधिकृत जप्त यादीत समाविष्ट झालेले नाहीत. यामुळे दोन शक्यता उभ्या राहतात एकतर कारवाई केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित होती किंवा जप्तीच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही परिस्थिती प्रशासनासाठी तितक्याच गंभीर आहेत.
Rajura Illegal Sand
या संदर्भात तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. जर खरोखरच कारवाई झाली असेल, तर जप्त वाहनांची नोंद कुठे आहे? ती सार्वजनिक का केली गेली नाही? आणि जर कारवाईनंतर वाहनांना मुक्त सोडण्यात आले असेल, तर त्यामागे कोणाचा, कसला दबाव किंवा व्यवहार कार्यरत होते? असे थेट आणि टोकदार प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Rajura Illegal Sand
अवैध वाळू तस्करी हा केवळ महसुली तोटा नसून पर्यावरणीय आणि कायदेशीर गुन्हाही आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाईची सातत्यता, पारदर्शकता आणि नोंदवहीतील अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. अन्यथा, “कारवाई” हा शब्द केवळ कागदोपत्री राहतो आणि प्रत्यक्षात तस्करीला मोकळे रान मिळते.
राजुरा तालुक्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांबाबत तक्रारी झालेल्या आहेत, जिथे कारवाईचे दावे मोठ्या आवाजात केले जातात; मात्र त्याची कायदेशीर नोंद किंवा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकरणातही “कारवाई” ही प्रत्यक्षात अंमलबजावणी आहे की केवळ दिखावा, याची चौकशी होणे अत्यावश्यक ठरते.
सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (SDO) तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ वस्तुस्थिती स्पष्ट करून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकणार हे निश्चित.
What happened in the Rajura illegal sand mining case?
Why is this case creating controversy?
Who conducted the action against the illegal sand transport?
What are citizens demanding in this case?
#Rajura #IllegalSandMining #SandMafia #RajuraNews #Chandrapur #MaharashtraNews #SandSmuggling #RevenueDepartment #Talathi #DeepakShelke #TehsilOffice #PoliceStation #TractorSeizure #MissingTractors #CorruptionAlert #RevenueScam #MiningScam #SandTheft #AdministrativeFailure #LocalNews #BreakingNews #MahawaniNews #Maharashtra #IllegalMining #SandTransport #RevenueAction #PoliceInquiry #TehsilAdministration #PublicQuestions #Transparency #Governance #LawAndOrder #VillageNews #Devada #DevadaNews #ChandrapurNews #DistrictAdministration #IllegalTransport #MineralTheft #ActionOrDrama #SystemFailure #TruthExposed #GroundReport #NewsUpdate #CitizenVoice #PublicInterest #InvestigationNeeded #RuralJournalism #MediaWatch #Accountability #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReport #OmprakashGond #VasumanaPant #RavindraMane #DilipShelke
.png)

.png)