Durgapur CSR Scam | दुर्गापूर ग्रामपंचायतीत पाच लाखांच्या कथित गैरव्यवहाराचा स्फोट

Mahawani
0
A bold Marathi news collage highlighting the Durgaapur Gram Panchayat CSR scam, showing missing 50 sewing machines worth ₹5 lakh. The image features Gram Panchayat office boards, multiple sewing machines, an official WCL document confirming machine distribution, and villagers submitting a complaint letter, with large red and black Marathi headline text about the alleged corruption and demand for criminal action.

वेकोलीकडून सामाजिक दायित्व निधीत ५० शिलाई मशिन दिल्याची नोंद, मात्र ग्रामपंचायतीकडे ‘माहितीचा अभाव’

Durgapur CSR Scamचंद्रपूर | कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू महिला, मुली आणि पात्र लाभार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी देण्यात आलेल्या ५० शिलाई मशिनांच्या वाटपावरून दुर्गापूर ग्रामपंचायतीत गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून, या प्रकरणाने स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत व्यवस्था आणि CSR निधीच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दुल मारोती गणवीर यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन सरपंच तथा अद्यावत प्रशासक पूजा पवन मानकर यांच्यावर थेट पाच लाख रुपयांच्या आर्थिक लुटीचा आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय विश्वासघाताचा गंभीर आरोप करत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Durgapur CSR Scam

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका वर्तमानपत्रातील बातमीपासून झाली. ग्रा.पं. कार्यालय दुर्गापूर येथे CSR निधी अंतर्गत ५० शिलाई मशिन वाटप झाल्याची बातमी वाचल्यानंतर शार्दुल गणवीर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करून सात मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागविली. या अर्जामध्ये लाभार्थ्यांची यादी, निवड प्रक्रिया, अर्ज, कागदपत्रे, वितरणाची तारीख, छायाचित्रे, कार्यालयीन नोंदी, जावक-आवक नोंद, ठराव आणि इतर संबंधित दस्तऐवजांची मागणी करण्यात आली होती.

Durgapur CSR Scam

मात्र, ग्रामपंचायत कार्यालयातील तत्कालीन माहिती अधिकारी श्री. युवराज कवडू वेरकडे यांनी लेखी उत्तर देत ग्रामपंचायत कार्यालयाच्या दप्तरी शिलाई मशिन वाटपासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायत कार्यालयातच कोणतीही नोंद नसल्याचा हा दावा अत्यंत धक्कादायक होता. कारण सार्वजनिक निधीतून, तेही CSR अंतर्गत झालेल्या वितरणाची नोंदच नसणे म्हणजे प्रशासकीय अपयश की हेतुपुरस्सर दडपशाही, हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला.

Durgapur CSR Scam

याच संशयातून शार्दुल गणवीर यांनी थेट Western Coalfields Limited अर्थात वेकोली, चंद्रपूर कार्यालयात माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागविली. तेथे मिळालेल्या अधिकृत उत्तरात वेकोलीकडून दुर्गापूर ग्रामपंचायत कार्यालयाला एकूण ५० शिलाई मशिन प्रदान करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. एकीकडे ग्रामपंचायत ‘माहिती नाही’ म्हणत होती, तर दुसरीकडे वेकोली अधिकृतपणे मशिन देण्यात आल्याची पुष्टी करत होती.

Durgapur CSR Scam

मिळालेल्या माहितीवरून असे उघड झाले की, वे.को.लि. उपक्षेत्र दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या CSR निधी अंतर्गत स्वीकृत WCL Action Plan 2024-2025 नुसार गावातील पात्र लाभार्थी, विशेषतः मुली व महिलांना रोजगाराभिमुख मदत म्हणून शिलाई मशिन वितरणासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे मागणी करण्यात आली होती. म्हणजेच ही योजना केवळ कागदोपत्री नव्हती, तर ती अधिकृत प्रक्रियेतून मंजूर झालेली योजना होती.

Durgapur CSR Scam

नियमाप्रमाणे अशा योजनांसाठी गावात मुनादी, दवंडी, प्रसिद्धी करून इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविणे आवश्यक असते. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, शासनमान्य संस्थेमार्फत घेतलेल्या शिवणकला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, इतर पात्रता निकषांनुसार आवश्यक दस्तऐवज सादर करणे अपेक्षित असते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पारदर्शक निवड प्रक्रिया पार पाडून संपूर्ण यादी तयार करणे बंधनकारक असते. वितरणावेळी लाभार्थ्यांची नावे, पत्ते, मशिनची संख्या, रंगीत छायाचित्रे, दिनांक, वेळ, ठिकाण यांची कार्यालयीन नोंद ठेवणे ही मूलभूत प्रशासनिक जबाबदारी आहे.

Durgapur CSR Scam

परंतु या प्रकरणात यापैकी कोणतीही प्रक्रिया झाल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाहीत. ना लाभार्थी यादी, ना अर्ज, ना फोटो, ना वितरण पंचनामा, ना जावक नोंद, ना नोंदवहीतील उल्लेख. यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. तक्रारकर्त्यांचा आरोप आहे की तत्कालीन सरपंच पूजा पवन मानकर यांनी या सर्व मशिनांवर “ताव मारत” त्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लंपास केल्या आणि गावातील ५० पात्र, गरजू महिलांना रोजगारापासून वंचित ठेवले.

Durgapur CSR Scam

याहून गंभीर आरोप म्हणजे बनावट प्रमाणपत्राचा. गणवीर यांच्या मते, ग्रामपंचायत दुर्गापूर कार्यालयाला मशिन प्राप्त झाल्याचे हुबेहुब खरे वाटेल अशा पद्धतीने एक अप्रामाणिक, खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले. या कथित प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत कार्यालयाचा शिक्का मारण्यात आला, मात्र सचिवाची सही घेण्यात आली नाही. फक्त तत्कालीन सरपंचांनी स्वतः सही करून ते प्रमाणपत्र वेकोली कार्यालयात सादर करण्यात आले. जावक क्रमांक १२७६/२०२५, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ (खाली Related Documents मध्ये जोडले आहे.) असा उल्लेख करून ५० शिलाई मशिन प्राप्त झाल्याचे दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Durgapur CSR Scam

जर हा आरोप सत्य ठरला, तर हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून भारतीय दंड संहितेनुसार फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, सार्वजनिक निधीचा अपहार, विश्वासघात आणि शासकीय नोंदींमध्ये फेरफार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यांच्या कक्षेत येणारे प्रकरण ठरू शकते. विशेषतः मागासवर्गीय, गरीब व रोजगारवंचित महिलांसाठी असलेला CSR निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेला असल्यास हा सामाजिक न्यायावरच घाला मानला जाईल.

Durgapur CSR Scam

गणवीर यांनी ग्रामपंचायत दुर्गापूरच्या ग्रामपंचायत अधिकारी वंदना माथनकर यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार सादर करून तत्कालीन सरपंचांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अंदाजे पाच लाख रुपये किंमतीच्या ५० शिलाई मशिनांची चोरी करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. “गावातील गरीब महिलांच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांना संरक्षण नव्हे, तर कायद्याची कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

Durgapur CSR Scam

या तक्रारीवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे, माजी तालुकाध्यक्ष विनाश कातकर, ग्रामपंचायत दुर्गापूरच्या माजी सदस्या सपनाताई गणवीर, खैरगाव वांदसुर्ला येथील माजी सरपंच पांडूरंग, सामाजिक कार्यकर्त्या पपिताताई जूनघरे, सोमेश्वर सोरते, प्रफूल उमरे, संतोष रणवीर, मुकेश हुमणे, प्रशांतदादा आसूटकर, राजू बांबोळे, प्रभाकर कोसनकर तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Durgapur CSR Scam

प्रश्न आता फक्त ५० शिलाई मशिनांचा नाही; प्रश्न आहे ग्रामीण भागातील गरीब महिलांच्या हक्काचा, CSR निधीच्या प्रामाणिक वापराचा आणि ग्रामपंचायत व्यवस्थेवरील लोकविश्वासाचा. ग्रामपंचायत कार्यालयाकडे नोंद नाही, पण वेकोलीकडे पुरावा आहे. या विसंगतीचे उत्तर प्रशासनाने तातडीने द्यावे लागेल. अन्यथा “CSR” या नावाखाली सुरू असलेल्या योजनांवर जनतेचा विश्वास कायमचा ढासळेल.



आता सर्वांचे लक्ष ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. तक्रारीवर निष्पक्ष चौकशी होणार का? कथित दोषींवर गुन्हा दाखल होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे ज्या ५० महिलांसाठी ही योजना होती, त्यांना न्याय मिळणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.


What is the Durgaapur Gram Panchayat CSR sewing machine scam?
The scam involves allegations that 50 sewing machines provided under CSR funds by WCL for poor women in Durgaapur were allegedly misused and never distributed to the actual beneficiaries.
How was the sewing machine scam exposed?
The case was exposed through RTI applications filed by information activist Sharadul Ganveer, who found that WCL confirmed delivery of 50 machines while the Gram Panchayat claimed no records were available.
What is the estimated financial loss in this case?
The estimated value of the missing 50 sewing machines is around Rs 5 lakh, which has raised serious concerns about financial fraud and misuse of CSR funds.
What legal action has been demanded in this matter?
A written complaint with documentary evidence has been submitted demanding immediate criminal action against the former Sarpanch and a full investigation into the alleged fraud and forgery.


#Durgapur #GramPanchayat #CSRScam #SewingMachineScam #Chandrapur #RTI #RTIActivist #SharadulGanveer #Corruption #MaharashtraNews #VillageCorruption #CSRFunds #WCL #WesternCoalfields #GramPanchayatScam #WomenEmpowerment #MissingMachines #PublicFunds #FraudCase #FakeCertificate #ForgeryCase #PanchayatNews #LocalCorruption #AdministrativeFailure #RuralDevelopment #JusticeForWomen #CSRFundMisuse #ScamExposed #BreakingNews #Investigation #LegalAction #FraudAlert #VillagePolitics #PublicAccountability #GovernanceFailure #WomenRights #PoorWomenJustice #EmploymentScheme #SarpanchScam #ChandrapurNews #MahavaniNews #GovernmentScheme #BenefitScam #SocialJustice #PanchayatCorruption #FinancialFraud #RuralNews #CrimeNews #MaharashtraPolitics #CSRInvestigation #ChandrapurNews #VeerPunekarReport #MahawaniNews #DurgapurNews #CSRNEws #WclNews #RaviDhawan

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top