Fake Journalist Chandrapur | चंद्रपूरात ‘पत्रकार’ नामधारी टोळीची खंडणी उघड

Mahawani
0

A picture of a gang that tarnishes the sacred platform of journalism and a picture labeled as a fake journalist

‘मीडियाच्या’ नावाखाली दहशत माजवून विधवा महिलेकडून एक लाखांची खंडणी वसूल

Fake Journalist Chandrapurचंद्रपूर | पत्रकारितेच्या नावाने समाजात मिळणाऱ्या सन्मान आणि विश्वासाचा वापर गुन्हेगारीसाठी करणाऱ्या भामट्यांचा महसूल अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत आहे. माध्यमे, प्रेस कार्ड, मायक्रोफोन आणि “न्यूज” या शब्दाची ढाल वापरून भीतीचे वातावरण तयार करून सामान्य नागरिकांच्या घरी घुसून खंडणी उकळण्याचा नव्या स्वरूपाचा गुन्हेगारी उद्योग जिल्ह्यात मूळ धरत असल्याचे रामनगर पोलीस ठाण्यातील एका गंभीर प्रकरणाने अधोरेखित केले आहे. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकरणात समाजातील सर्वात असुरक्षित घटक – एक असहाय व विधवा महिलेला ५-६ जणांच्या टोळीने “पत्रकार आहोत” असा धाक दाखवत थेट घरात घुसून बातमी प्रकाशित करण्याची धमकी देत जबरदस्ती एक लाख रुपये हिसकावून घेतल्याचा धक्कादायक गुन्हा नोंदविण्यात आला.


या प्रकरणाची गंभीरता इतकी भयावह आहे की आरोपींनी “बातमी न छापण्यासाठी” तसेच “पैसे न दिल्यास जीवे ठार मारू” अशा थेट धमक्या देत पीडितेकडून जुलूमाने रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकारितेचा पवित्र व्यवसाय, जो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, त्या व्यासपीठाला अशा बेकायदेशीर कृत्यांनी कलंकित करणाऱ्यांना भारतीय न्याय संहितेतील कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने कडक कारवाई केली आहे.


रामनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात अपराध क्रमांक ८७७/२०२५ नुसार कलम ३०८(५), ३३३ आणि ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, गुन्ह्याचे प्राथमिक स्वरूप हे सरळ गुन्हेगारी, खंडणी व दहशत निर्माण करणारे असले तरी, आरोपींनी स्वतःला पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी म्हणून सादर केल्याने हा गुन्हा केवळ एका व्यक्तीविरोधात नव्हे तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावरील सार्वजनिक विश्वास डळमळीत करणारा ठरतो.


‘पत्रकार’ म्हणून स्वतःची ओळख; पोलिस तपासात भेदरवणारे खुलासे

प्राथमिक चौकशीत रामनगर पोलिसांनी आरोपींबाबत माहिती गोळा केली असता हे सर्वजण वेगवेगळ्या वेबपोर्टल, दैनिके आणि टीव्ही न्यूज चॅनेलशी संलग्न असल्याचे पुरावे समोर आले. यामुळे या टोळीची कार्यपद्धती केवळ प्रसंगी गुन्हा करणारी नव्हती, तर माध्यमांच्या लेबलचा वापर करून विशिष्ट पद्धतीने विश्वास संपादन करणे, दडपशाही करणे आणि पैशाची मागणी करणे अशी सुनियोजित पद्धती असल्याचे दिसते.


अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – १. सत्यशोधक न्यूज (वेबपोर्टल), चंद्रपूर – मुख्य संपादक राजु नामदेवराव शंभरकर (वय ५७), रा. घर नं. ९८२, लालपेठ कॉलरी नं. १, चंद्रपूर २. इंडिया २४ न्यूज (वेबपोर्टल), चंद्रपूर – जिल्हा प्रतिनिधी कुणाल यशवंत गर्गेलवार (वय ३७), रा. विठ्ठल मंदिर वार्ड, मथुरा चौक, चंद्रपूर ३. दैनिक विदर्भ कल्याण (दैनिक), उमरेड-नागपूर – चंद्रपूर तालुका प्रतिनिधी अविनाश मनोहर मडावी (वय ३३), रा. इंदिरानगर, मुल रोड, चंद्रपूर ४. भारत टीव्ही न्यूज (टीव्ही चॅनल), आग्रा – चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजेश नारायण निकम (वय ५६), रा. जमनजेट्टी पाटील वाडी, लालपेठ वार्ड, चंद्रपूर


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. केवळ एवढेच नव्हे, तर या कटात आणखी दोन साथीदार सामील असल्याचे उघड झाले आहे. हे दोघे सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.


पत्रकारिता – की खंडणी? समाजाच्या विश्वासाला गालबोट

या प्रकरणाने समोर आणलेला मोठा आणि चिंताजनक मुद्दा म्हणजे पत्रकारिता नावाच्या परवान्याचा गैरवापर करून उभी राहिलेली गुन्हेगारी टोळी. पत्रकारितेवर असलेला विश्वास, पत्रकाराच्या ओळखीशी असलेली दहशत किंवा मान-सन्मानाचा गैरफायदा घेत नागरिकांवर खंडणीसाठी मानसिक दबाव आणण्याची प्रवृत्ती धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याचे हे प्रकरण सिद्ध करते.


आज प्रत्येक शहरात, गावात अगदी गल्लीबोळातसुद्धा “ऑनलाइन न्यूज पोर्टल” आणि “प्रेस कार्ड” च्या नावाखाली शेकडो पोर्टल्स तयार होत आहेत. कोणतेही नियमन नाही, पडताळणी नाही, नोंदणी नाही – पण मायक्रोफोन, फोटो आणि “LIVE” असा स्टिकर लावलेला मोबाईल हातात घेतला की व्यक्ती अचानक पत्रकार बनल्याचा आभास निर्माण करतो. अशा बोगस पत्रकारांच्या आडून समाजात निर्माण होणारी दहशत चिंता वाढवणारी आहे.


या प्रकरणात पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप न केला असता, पीडितेकडून जुलूमाने वसूल केलेली रक्कमच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही अपरिवर्तनीय परिणाम झाला असता. पत्रकारितेचे नामधारी गुंड म्हणून ओळख निर्माण करणारी ही टोळी समाजात भीती निर्माण करून, गुप्त व्हिडिओ, फोटो, अथवा खोटे आरोप लावून नागरिकांना मानसिक छळाचे शस्त्र म्हणून “बातमी” ची धमकी देत असल्याचे निश्चित लक्षात घ्यावे लागेल.


रामनगर पोलीसांचा जलद आणि ठोस हस्तक्षेप

या प्रकरणाने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना, रामनगर पोलिसांनी तत्परतेने घेतलेली कारवाई कौतुकास्पद ठरते. पोलिस निरीक्षक श्री. आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सपोनि श्री. देवाजी नरोटे, श्री. निलेश वाघमारे, श्री. हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, बाबा नैताम, मनीषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्लवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे आणि ब्ल्युटी साखरे यांच्या संयुक्त कार्यवाहीत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.


या प्रकरणाने प्रशासनाला अत्यंत महत्वाचा इशारा दिला आहे – पत्रकारिता नावाने खंडणी उकळणाऱ्या टोळ्या आता संघटित पद्धतीने कार्यरत आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या गंभीर तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा, विशेष सेल किंवा पत्रकारिता परवाना पडताळणी प्रणालीची नितांत गरज आहे.


जिल्ह्यात कोणीही स्वतःला पत्रकार अथवा पोलीस असल्याचे सांगून घरात घुसत असेल, अवैध मागण्या करत असेल किंवा खंडणी उकळत असेल, तर ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी – केवळ भीतीपोटी सहन करणे म्हणजे गुन्हेगारांचे प्रोत्साहन.


पोलिसांकडून पुढील आवाहन नागरिकांसाठी जारी करण्यात आले आहे:

“कोणतीही व्यक्ती पत्रकार किंवा पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक, खंडणी किंवा दडपशाही करत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा अथवा डायल ११२ वर फोन करून माहिती द्या.”


पत्रकारिता: स्वातंत्र्य की परवाना? – व्यापक चौकशीची मागणी

या प्रकरणासोबतच एक व्यापक सामाजिक प्रश्न पुन्हा पुढे येतो — पत्रकारिता हा अधिकार आहे, की परवाना? पत्रकारितेच्या नावावर अनियंत्रित प्रमाणात चालणाऱ्या खोट्या पोर्टल्स, अवैध प्रेस कार्ड्स, कोणत्याही संस्थेशी संबंध नसताना घेतली जाणारी “मी पत्रकार आहे” अशी ढाल या गोष्टींवर शासनाने आता कठोर पावले न उचलल्यास, लोकशाहीचा चौथा स्तंभ जनतेचा विश्वास गमावू शकतो.


पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वास्तविक, कर्तव्यनिष्ठ आणि सच्च्या पत्रकारांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या या घटनांवर गदा आणण्यासाठी पोर्टल नोंदणी प्रक्रिया, पत्रकार ओळखपत्र पडताळणी, पत्रकार संघटनांची उत्तरदायित्व प्रणाली, फेक मीडिया नियंत्रण कायदा यासारख्या उपाययोजनांची तातडीने गरज निर्माण झाली आहे.


या प्रकरणातील आरोपींच्या अटकेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असला, तरी ही घटना हिमनगाचे टोक असल्याची भीती व्यक्त होत आहे. पत्रकारितेचा वापर ढाल म्हणून करून खंडणी उकळण्याची वृत्ती फक्त एक गुन्हा नाही — ती लोकशाहीला गिळंकृत करणारी घातक प्रवृत्ती आहे.


या टोळीला कठोर शिक्षेसह, जिल्ह्यातील प्रत्येक “मीडिया” नावाने धंदा करणाऱ्यांची संपूर्ण चौकशी होणे ही वेळेची गरज आहे. कारण पत्रकारिता ही जनतेचा आवाज बनण्याची जबाबदारी आहे नाकी खंडणीचे हत्यार


खऱ्या पत्रकारितेला असलेला धोका आणि प्रशासनासमोरील आव्हान लक्षात घेत, या प्रकरणाचा तपास केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित न ठेवता, पत्रकारिता क्षेत्रातील फसवणुकीच्या संपूर्ण रॅकेटचा भंडाफोड करण्याची आवश्यकता आता अपरिहार्य ठरते.


What is the Chandrapur fake journalist extortion case about?
This case involves a group of fake journalists who entered a widow’s house, threatened to publish defamatory news about her, and extorted ₹1 lakh under death threats.
How many accused have been arrested in this case?
Four individuals have been arrested, all posing as media personnel linked to various web portals, newspapers, and TV channels.
What legal action has been taken by the police?
A case has been registered under IPC sections relating to extortion, intimidation, and criminal conspiracy, and the accused have confessed during interrogation. Two more accomplices are currently being traced.
What should citizens do if someone misuses press identity for extortion?
Citizens should immediately report such incidents to the nearest police station or call emergency helpline 112 without fear or delay.


#Chandrapur #FakeJournalists #ExtortionCase #MediaFraud #ChandrapurNews #BreakingNews #CrimeNews #PoliceAction #JournalismEthics #FakeMedia #PressMisuse #JusticeForVictims #RamNagarPolice #LawAndOrder #IndiaNews #ViralNews #MaharashtraNews #CrimeReport #PoliceInvestigation #PressFreedom #StopExtortion #MediaCorruption #FakePress #WomenSafety #VictimJustice #TrendingNow #ChandrapurCrime #NewsUpdate #CrimeAlert #FraudExposed #PressCrime #RealJournalism #MediaAccountability #DigitalMediaFraud #PoliceCrackdown #MediaScam #MediaShame #JournalistArrested #ChandrapurPolice #SpeakUp #FightCorruption #WomenRights #SafetyFirst #TruthMatters #FourthPillar #PublicAwareness #JusticePrevails #SocialImpact #CrimeWatch #MahwaniNews #MarathiNews #VeerPunekarReport

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top