शेतकरी संघटनेच्या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Tanha Pola Festival Sasti | राजुरा | सास्ती गावात शेतकरी संघटना, सास्ती तर्फे आयोजित तान्हा पोळा उत्सव स्पर्धा पर्व दुसरे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. हनुमान (मोठा) मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात गावातील शेतकरी, महिला मंडळे, बालके आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक संदेश यांचा संगम घडवला.
या कार्यक्रमास अध्यक्ष आणि पंच म्हणून अधिवक्ता दीपक चटप, प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य युवा आघाडी, तसेच डॉ. प्रमोद जेल्लेवार, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Tanha Pola Festival Sasti याशिवाय उद्धव लोहबडे, भाजपा जिल्हा सचिव मधुकर नरड, मारुती लांडे, माजी सरपंच रमेश पेटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनीता भोगेकर, मनोज सिडाम, मधुकर झाडे, व्यायाम शाळांचे अध्यक्ष गणपत काळे, विठोबा गर्गेलवार, तसेच मोठा हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष संजय वैरागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्सवाला उपस्थिती लावली.
६१ नंदीबैल जोड्यांची आकर्षक सजावट
गावातील ६१ तान्ह्या नंदीबैल जोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. शेतकऱ्यांच्या जीवनावर, भारतीय जवानांच्या शौर्यावर तसेच सामाजिक घटनांवर आधारित सजावट करून मुलांनी साकारलेल्या या नंदीबैल जोड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. ग्रामीण संस्कृतीची ओळख जपणारा हा सोहळा गावकऱ्यांच्या प्रचंड उत्साहात पार पडला.
क्रमांक | बक्षीस | नाव |
---|---|---|
1 | प्रथम क्रमांक | कु. ओवी राजू भटारकर |
2 | द्वितीय क्रमांक | कु. श्रेयश करण वैरागडे |
3 | तृतीय क्रमांक | कु. सदिच्छा सचिन चन्ने |
4 | उत्कृष्ट वेशभूषा चषक | कु. प्रग्नेश गणेश रचावार |
5 | प्रोत्साहन पारितोषिक | कु. सिद्धार्थ प्रशांत वाघे |
6 | प्रोत्साहन पारितोषिक | कु. प्रियांशी देवानंद लांडे |
7 | प्रोत्साहन पारितोषिक | कु. उमंग अविनाश वडस्कर |
प्रथम बक्षीस श्री. किशोर दरेकर, द्वितीय बक्षीस श्री. हितेश रमेश लांडे, तृतीय बक्षीस श्री. संजय वैरागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. Tanha Pola Festival Sasti तसेच स्वर्गीय विठोबा नरड यांच्या स्मृतीपित्यर्थ मधुकर विठोबाजी नरड यांच्या वतीने आकर्षक चषक देण्यात आला.
महिला मंडळाचा गौरव
गावातील गुरुदेव सेवा मंडळ आणि महिला मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती, राजुरा यांच्या वतीने सौ. इंदिराबाई कुडे यांचा सत्कार करण्यात आला. Tanha Pola Festival Sasti तसेच गावाचे उपसरपंच सचिन भाऊ कुडे यांच्या कार्याची दखल घेत महिला मंडळाच्या वतीने त्यांना शाल–श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक वातावरण आणि संदेश
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती मनोज मोहितकर हिने केले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री. आनंद मांडवकर यांनी पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान “जय जवान – जय किसान”, शेती करा, शेती वाचवा हा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता दीपक चटप यांनी तरुणांना शेतीच्या संवर्धनाबरोबरच ग्रामीण समाजातील बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. Tanha Pola Festival Sasti आधुनिकतेच्या काळातसुद्धा शेती हीच खरी कणा असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी युवकांना सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे मार्गदर्शन केले.
आयोजक व मित्रमंडळाचा सहभाग
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जाणता राजा मित्र मंडळ परिवाराने केले होते. त्यात दीपक देरकर, गजानन भोगेकर, सुमन जंगलीवार, साईनाथ ठमके, आशिष गिरसावळे, रोशन नांदेकर, गोपाल पिंपळशेंडे, सावन नैताम, कैलास खवसे, अनिल मोहितकर, सागर तोटावार, मंगेश धोटे, कमलाकर शेंडे, सोनू शेंडे, रीतिक पेटकर, अनिल गुंडेटी, रोशन नागोसे, मनोज जानवे, दिनेश मोहितकर, राहुल कोडापे आदी युवकांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
सास्ती गावातील तान्हा पोळा उत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि बालकांच्या कल्पकतेचा एकत्रित उत्सव ठरला. Tanha Pola Festival Sasti या उपक्रमातून समाजाला कृषी, सैनिकांचे शौर्य आणि एकात्मतेचा संदेश दिला गेला. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि महिला मंडळांच्या सहभागामुळे सास्ती गावाने पुन्हा एकदा आपली सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवली.
What is the significance of the Tanha Pola festival in Sasti village?
How many participants took part in this year’s Tanha Pola at Sasti?
Who were the chief guests and judges at the event?
What message was conveyed through the Tanha Pola celebrations?
#TanhaPola #SastiVillage #FarmersFestival #BullockDecorations #CulturalTradition #AgricultureHeritage #RuralIndia #ChildrensFestival #ShivMandirSasti #MaharashtraCulture #TraditionalCelebration #VillageFestivals #BullockCart #FarmersUnity #IndianTradition #CulturalIndia #YouthParticipation #WomenEmpowerment #AnimalRespect #IndianVillages #FestivalOfBulls #FarmersLife #SastiNews #MaharashtraFestivals #IndianCulture #BullFestival #VillageCelebration #AgricultureIndia #IndianFarmers #RuralFestivals #UnityInDiversity #FarmersDay #CulturalEvents #IndianYouth #SaveFarming #VillageChildren #SocialMessage #JaiJawanJaiKisan #RespectFarmers #CulturalSpirit #TanhaBailPola #FestivalVibes #TraditionalIndia #VillagePride #BullDecorations #FarmerStrength #IndianVillagesCulture #MaharashtraTradition #CelebratingFarmers #VillageFestSpirit #MahawaniNews #VeerPunekarReport #SastiNews #RajuraNews #PolaNews