परिसरात एकच खळबळ, कुटुंबीयांची सीआयडी चौकशीची मागणी
Ranjit Nishad Case | राजुरा | तालुक्यातील मानोली (बु.) शेतशिवारात बल्लारपूर येथील अल्पवयीन रणजित निशाद उर्फ कट्टाणी (वय १७) याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूच्या कारणांभोवती गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
८ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता रणजित सात मित्रांसह राजुरा तहसीलमधील गौरी सास्ती, कढोली परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी व वेकोली क्षेत्रात गेला होता. Ranjit Nishad Case मात्र तो परत आला नाही. दुसऱ्या दिवशी रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली. या गटात रणजित नव्हता, परंतु त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या एका तरुणाने पोलिसांकडे जमा केला होता. या घटनेनंतर रणजितच्या गायब होण्याबाबत कुटुंबीयांचा संशय अधिक गडद झाला.
यापूर्वीच रणजितच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्याची आई राजाराणी व वडील दिनेश यांनी स्पष्ट केले की, कोळसा खाणी व वॉशरी परिसरात रात्री चोरीच्या घटना वारंवार घडतात. Ranjit Nishad Case त्याच संदर्भात रणजित व त्याचे मित्र तेथे गेले होते. मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह मानोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या मृत्यूमागील सत्य अधिकच गूढ झाले आहे.
रणजितच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासकार्य सुरू केले आहे.
ही घटना केवळ एका अल्पवयीनाच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, कोळसा पट्ट्यातील असुरक्षितता, चोरीसाठी तरुणांचा वापर, तसेच पोलिस तपासातील त्रुटी या सर्व प्रश्नांना पुन्हा अधोरेखित करते. Ranjit Nishad Case आता या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी सीआयडी चौकशी होणे अत्यावश्यक ठरत आहे.
Who was Ranjit Nishad?
When and where was he last seen alive?
Why is the family demanding a CID probe?
What is the current status of the investigation?
#RanjitNishadCase #RanjitNishad #Rajura #Chandrapur #Manoli #CIDProbe #JusticeForRanjit #CoalBeltCrimes #MurderMystery #TruthMustPrevail #YouthSafety #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #JusticeMatters #CoalMafia #WasheryCase #UnsolvedDeath #RajuraUpdates #ChandrapurUpdates #IndiaNews #TeenDeath #CoalTheft #LawAndOrder #ForensicProbe #DemandForJustice #PoliceInvestigation #CIDInvestigation #SuspiciousDeath #RuralCrime #HumanRights #ParentsDemandJustice #JusticeDelayedJusticeDenied #RaiseYourVoice #CrimeInMaharashtra #UnansweredQuestions #YouthRights #Accountability #JusticeNow #CoalBeltTruth #RajuraCrime #ChandrapurCrime #RanjitCase #InvestigateNow #FearlessJournalism #CoalFieldDeath #FamilyDemandsCID #StopCrimeNow #VoiceForJustice #PublicAccountability #MahawaniNews #RajuraNews #BallarpurNews #MarathiNews #Batmya