क्रेन-डंपरने बेधडक व बिनधास्त तसकरी, कोट्यवधींचा महसूल गडप
Illegal Sand Mining | राजुरा | तालुक्यातील वर्धा नदी परिसर आज एका भयानक वास्तवाचा साक्षीदार ठरत आहे. धानोरा, आर्वी, विरूर स्टेशन आदी भागांत अवैध रेती उत्खननाचे साम्राज्य उभे राहिले असून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. नियम-अटी, परवाना प्रक्रिया आणि कायद्याला बगल देत काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने रेती माफियांनी प्रशासनाला गप्प बसवले आहे. क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या मदतीने दिवसाढवळ्या सुरू असलेला हा ‘रेती लुटारू उद्योग’ आता नदीपात्राबरोबरच समाजाच्या विश्वासालाही पोखरून काढत आहे.
नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींनंतरही कारवाईच्या बाबतीत मात्र प्रशासन मृतवत आहे. जणू माफियांचे हात त्यांच्याही गळ्याशी घट्ट आवळले आहेत. Illegal Sand Mining रात्रीच्या अंधारात सुरू होणाऱ्या या वाहतुकीने फक्त नदीची नाही तर सार्वजनिक रस्त्यांचीही दुर्दशा केली आहे. भेंडाळा–विरूर स्टेशन–अमृतगुडा मार्गावरील खोल खड्डे मृत्यूचे सापळे ठरत असून, शालेय विद्यार्थ्यांपासून ते शासकीय वाहनांपर्यंत सर्वांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रेतीचा डंपर वेगाने धावत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या छोट्या गाड्या अक्षरशः थरथरत आहेत. मुलांना शाळेत पोचवणे ही पालकांची कसरत झाली असून, लोकांचा संयम आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
पर्यावरणीय आणि पुरातत्त्व नियमांनुसार कोणत्याही पुलाच्या, महत्त्वाच्या वास्तूपासून ३०० मीटर परिसरात उत्खनन बंदी आहे. पण हे कायदे आज नदीपात्रात मृतदेहासारखे पडले आहेत. Illegal Sand Mining पूलांचे पाया पोखरले जात आहेत, काठावरील पिके उध्वस्त होत आहेत आणि वाळू उपशामुळे नद्यांचा प्रवाह बदलत असल्याची भीषण लक्षणे दिसू लागली आहेत. नदी म्हणजे गावाचे जीवन, परंतु या जीवावर रेती माफियांनी हातोडा मारला आहे. प्रशासन मात्र जणू ‘आंधळे, बहिरे’ बनून सोयीस्कर मौन पाळत आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी याला थेट भ्रष्टाचाराची देणगी ठरवली आहे.
या परिस्थितीवर तीव्र आक्रोश व्यक्त करत तालुका काँग्रेस कमिटी राजुरा यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. Illegal Sand Mining या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, तातडीने अवैध रेती उपसा रोखला नाही, वाहतुकीवर अंकुश ठेवला नाही तर जनतेला घेऊन जोरदार आंदोलन उभारण्यात येईल. काँग्रेसने दिलेला हा इशारा आता जनतेच्या मनातील उद्रेकाचेच प्रतिबिंब आहे.
युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, मंगेश गुरनुले, प्रणय लांडे, अभिजीत भुते, हेमंत झाडे, सुभाष बोरकुटे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी या वेळी ठामपणे उभे राहिले. त्यांचा स्वर एकच होता – “नदी पोखरणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे!”
राजुरा तालुक्यातील या रेती तस्करीच्या प्रकरणाने आज शासनाच्या महसूल विभागाचा गळा पकडला आहे, पोलिसांची कंबर तोडली आहे आणि प्रशासनाचे चांगलेच धिंडवडे काढले आहेत. Illegal Sand Mining शासन रोज ‘डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, हरित महाराष्ट्र’चे घोषवाक्ये देत असले तरी जमिनीवर मात्र रेती माफिया त्यांच्या आशीर्वादानेच ऐट मारत आहेत, हे उघड गुपित झाले आहे. रेतीच्या पैशाच्या घाणीत न्हालेल्या या यंत्रणेला लोक आता सरळ सवाल करत आहेत – “सरकार कुठे झोपले आहे?”
नदीचा सर्वनाश झाला तरी या लुटारूंच्या लालसेचा नाश होईना. महसूल गडप, रस्ते पोखरलेले, विद्यार्थी धोक्यात, शेतकऱ्यांचे नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास… एवढा मोठा गुन्हा डोळ्यांसमोर घडत असताना जे प्रशासन गप्प बसले आहे, त्यांचा निष्क्रियतेचा अपराध जनता कधीच माफ करणार नाही. Illegal Sand Mining राजुरा तालुक्यातील जनता आज फक्त एकच मागणी करत आहे – “रेती माफियांवर तातडीने कठोर कारवाई करा, अन्यथा जनतेचा राग आंदोलनाच्या ज्वालामुखीसारखा उसळेल!”
What is happening in Rajura’s Wardha River area?
Why is this issue dangerous for locals?
Who is allegedly supporting the sand mafia?
What action has been demanded by citizens and opposition parties?
#IllegalSandMining #WardhaRiver #Rajura #SandMafia #SaveRivers #EnvironmentalCrisis #RevenueLoss #StopSandLoot #SandMiningScam #Chandrapur #StudentSafety #CorruptionExposed #RajuraNews #SandTransport #SaveNature #RoadDestruction #SandTuskers #SandLoot #IllegalMiningIndia #EcoDisaster #MafiaRaj #RajuraVoices #CitizenOutcry #CongressProtest #EnvironmentDamage #ChandrapurNews #SandMiningAlert #RiverLoot #EcoThreat #WakeUpAdministration #WaterCrisis #NatureInDanger #RajuraUpdate #SandCartel #GovernmentFailure #JusticeForStudents #InfrastructureCollapse #SandMiningBan #CorruptionRaj #GroundReality #SandSmuggling #VillagersVoice #RiverPoaching #EcoJustice #StopCorruption #SaveEnvironment #RajuraFight #SandCrisis #PeopleVsMafia #WardhaExploitation #RajuraNews #SandNews #CongressRajura #VeerPunekarReport #Shantanoodhote #Ranjanlande #VikasDevalkar #IrshadSheikh #SureshPawde #DhanrajChincholkar #Rambhaudhumane #MangeshGurnule #Pranayalande #AbhijitBhute #HemantJade #SubhashBorkute #SubhashDhote