प्रशासनाच्या बेपर्वाईने कामगारांवर रोज फिरतायत मृत्यूच्या सावल्या; आज जीव वाचला पण उद्या?
Gouri Mine Accident | राजुरा | कोळशाच्या खाणीत काळं सोनं खोदून आणणाऱ्या कामगारांच्या जिवाशी उघडपणे खेळ होत असताना, प्रशासन मात्र मूकबधिर झाल्यासारखं वागतंय. आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी गोवरी – पोवनी खुल्या खाणीत झालेला भीषण अपघात हेच वास्तव उघड करून गेला. सकाळी आठ वाजता खाण परिसरातील PWD रस्त्यावर गाडी क्रमांक MH-34-CJ-3578 (मालक – सतीशकुमार राय, माइनिंग सरदार) आणि गाडी क्रमांक MH-40-KR-6359 (जयंता मजुमदार, मेकॅनिक फोरमॅन, पोवनी खाण ड्युटीवर जात असताना) एका उभ्या ट्रकवर धडकल्या. सुदैवाने जीवितहानी टळली, पण भीषण अपघाताची कडा कामगारांच्या छाताडावर रोज कुरतडत बसली आहे.
रस्त्याच्या कडेला व बहुतांश वेळी अर्ध्यामार्गात उभ्या असलेल्या असंख्य ट्रक, त्याच्या अयोग्य पार्किंगवर कोणीही प्रश्न न विचारल्याने, दिवसा ढवळ्या सुरक्षेचा कागदावरच गोंगाट आहे हे या अपघाताने पुन्हा एकदा दाखवून दिलं. कामगारांच्या डोक्यावर मृत्यूच्या सावल्या रोज फिरतायत. Gouri Mine Accident तरीदेखील वारंवार प्रभारी अधिकारी यांना अनेकदा लेखी तक्रारी, मौखिक सूचना करूनही "सुरक्षेचं गांभीर्य" या विभागाच्या नजरेला जणू परक्या गोष्टीसारखं आहे. अपघातानंतरही प्रशासनाचा नेहमीचा सुर—"कुणाचे नुकसान झाले नाही"—या बेफिकीर उत्तरावरच संपला. पण कामगारांचा प्रश्न वेगळा आहे: आज वाचलो, उद्या कोणाची राख होईल याची हमी कोण देणार?
हे कोळसा उत्पादन फक्त आकडे, टार्गेट, आणि नफा यापुरते मर्यादित नाही. यामध्ये घाम, जीव आणि कामगारांच्या कुटुंबांची उद्याची स्वप्नं गुंतलेली आहेत. प्रशासन मात्र फक्त "टन" मोजतंय, जिवाची किंमत कुठेही दिसत नाही. खाण परिसरातील अपघात नवे नाहीत. Gouri Mine Accident वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले, पण प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांच्या "कारवाई करू" या कोऱ्या हमीवर आणि कामगार संघटनांचे पोकळ आश्वासनाने विषय थंडवला जातो. मात्र याच संघटना निवळणुकीत आम्हीच कामगारांचे कैवारी म्हणून स्वतःची पाट थोपटऊन घेतात परंतु या निष्काळजी वृत्तीचा परिणाम आजच्या अपघाताच्या रूपात डोळ्यांसमोर आलाय.
कामगारांचा रोष फक्त या अपघातापुरता नाही. गेल्या काही महिन्यांपासून खाण परिसरात सुरक्षा नियमांची घोर पायमल्ली होत असल्याची चर्चा सुरू आहे. हेल्मेट, लाइट्स, गाडींची नियमित तपासणी, ट्रक पार्किंगचे नियम – हे सर्व मुद्दे केवळ कागदांवर आहेत. Gouri Mine Accident प्रत्यक्षात मात्र, रोजच्या रोज कोणी तरी आपली ड्युटी पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालतो. जे अधिकारी या परिस्थितीकडे डोळेझाक करतात, ते कुणाच्या जीवावर जगतात हा प्रश्न आज कामगारांचे मन पोखरत आहे.
आजच्या अपघातानंतर कामगार संघटनांत खदखद वाढली आहे. येत्या २० ऑगस्टला बल्लारपूर क्षेत्रातील WCL DP अधिकारी पांडे यांच्याकडे या गंभीर विषयाची तक्रार लेखी स्वरूपात नोंदविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाचे कान उघडे करण्यासाठी कामगार एकत्र येतायत. जर यानंतरही बेफिकिरी कायम राहिली, तर ही ठिणगी मोठ्या आंदोलनात रूपांतरित होणार यात शंका नाही.
ही घटना केवळ एक "अपघात" नाही, तर खाण परिसरातील अपुऱ्या सुरक्षिततेची ओरड आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असलेले कामगार आज सुखरूप घरी परतले, पण उद्या कुणाचे मूल पोरके होईल, कुणाची पत्नी विधवा होईल याचा हिशेब कोण मांडणार? प्रशासनाच्या हलगर्जी वृत्तीने अनेक जीव धोक्यात आहेत. वारंवार प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची झोड उठली आहे—कामगारांचा जीव महत्त्वाचा की उत्पादनाचा आकडा?
गोवरी – पोवनी खुली खाण आज काळ्या सोन्याऐवजी काळ्या सावल्यांनी झाकली गेली आहे. कामगारांना सुरक्षेच्या नावाखाली रिकामी आश्वासने देऊन चालणार नाही. Gouri Mine Accident जोपर्यंत सुरक्षिततेच्या उपाययोजना कठोरपणे राबवल्या जात नाहीत, तोपर्यंत प्रत्येक दिवस हे "मृत्यूची वाट" ठरणार आहे. हा अपघात एक इशारा आहे, उद्या याच रस्त्यावर हंबरडा फोडणाऱ्या कुटुंबांची गर्दी जमण्याआधीच प्रशासनाने शुद्धीवर यायला हवं.
कामगारांचे रक्त गाळून कोळसा तर काढता येतो, पण सुरक्षितता न पाळता कामगारांचा विश्वास पुन्हा मिळवता येत नाही. प्रशासन जागे झाले नाही, तर ही बेपर्वाई थेट नरसंहार ठरू शकते.
What exactly happened in the Gouri Povhni open cast mine accident?
Why are workers blaming the authorities for this accident?
What are workers planning after this incident?
Could such accidents happen again in the future?
#GouriMineAccident #Rajura #GouriPovhni #MineAccident #WCL #CoalIndia #SafetyFirst #WorkersRights #Negligence #MiningCrisis #CoalSector #WorkplaceSafety #IndustrialAccident #Chandrapur #MaharashtraNews #MiningSafety #StopNegligence #CoalMafia #CoalProduction #OpenCastMine #SafetyIgnored #PWDroad #RajuraAccident #WCLNegligence #CoalWorkers #UnsafeMines #MiningIndia #CoalWorkersSafety #ChandrapurNews #MaharashtraToday #IndiaMining #WorkplaceHazards #MiningProtest #DemandSafety #CoalSectorNews #MiningLife #AccidentAlert #RajuraToday #ChandrapurUpdate #MineSafetyCrisis #WorkersProtest #SafetyViolation #CoalIndiaLimited #MiningAccidents #SaveWorkers #NoMoreAccidents #UnsafeWork #CoalSafety #IndustrialSafety #RajuraBreaking #WCLResponsibility #RajuraNews #VeerPunekarReport #SastiNews #WCLNews #SachinKude