Wirur Student Rescue | विरुर मार्गावर तीन तास बसमध्ये अडकले ६० विद्यार्थी

Mahawani
0
A photograph showing police personnel pulling students out of the water.

पोलिसांची धाडसी बचाव मोहिम; वाकडे यांच्या नेतृत्वात रात्रभर मदतकार्य

Wirur Student Rescueराजुरा | काल संध्याकाळी वरुर–विरुर मार्गावर आलेल्या पूरसदृश परिस्थितीत चिचबोडी, शिर्सी, टेंबुरवाही भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीची दैना उडाली. विशेषतः शालेय मुलांची दोन बस टेंबुरवाही मार्गावर अडकून पडली. जवळपास ६० विद्यार्थी पावसात आणि पुराच्या पाण्यात अडकले होते, या संपूर्ण परिस्थितीला हाताळताना ग्रामपंचायत टेंबुरवाही आणि विरुर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने कार्यवाही करत विद्यार्थ्यांना सहकार्य केले. 


दिवसभराच्या पावसामुळे वरुर–विरुर मार्गावरील नाले भरून वाहू लागले. टेंबुरवाही फाट्यावर, तसेच चिचबोडी व शिर्सी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने थांबली, वर्दळ ठप्प झाली. शाळेतील दोन बस या रस्त्यावर अडकल्या होत्या. पाणी एवढं वाढलेलं की, वाहनचालकांनाही पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता.


याच वेळी बसमध्ये ६० विद्यार्थी आणि काही शिक्षक अडकून पडले होते. Wirur Student Rescue अंधार, पावसाची संततधार, मोबाईल नेटवर्क नसणे – या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत संघनक चालक गणेश आकेवार व विरुर पोलीस ठाण्याशी संपर्क केला.


संपर्क मिळताच ठाणेदार संतोष वाकडे यांनी वेळ न घालवता आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस जीप पाण्यात उतरवत, आधी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. त्यातच टेंबुरवाही ग्रामपंचायतिचे अधिकारी अमोल बदखल, यांच्याशी संपर्क साधून त्यांना पिण्याचे पाणी, बिस्किटे, अल्पउपहार व तत्काळ धीर देणारी माहिती दिली.


संपूर्ण अंधारात आणि जोरदार पावसात पोलिसांनी दोन वेळा पाण्यातून फेरफटका मारत परिस्थितीचा आढावा घेतला. Wirur Student Rescue पाण्याचा प्रवाह कमी होताच, ठाणेदार वाकडे स्वतः समोर पोलिस जीप लावून मार्ग दाखवत दोनही बसेस सुरक्षित बाहेर काढल्या.


रात्रभर प्रयत्न, अखेर सुखरूप घरी पोहोचवले

रात्र झाली तरी पोलिसांनी आपले कार्य थांबवले नाही. विद्यार्थी बसमधून सुटले तरी त्यांना घरी पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. Wirur Student Rescue रात्री १२ वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जाधव, तसेच कर्मचारी राहुल वैद्य, विजय मुंडे, हर्षल लांडे आणि इतर जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


पालकांचा पोलिसांप्रती कृतज्ञभाव

या घटनेनंतर पालकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे मनापासून कौतुक केले. "आमच्या मुलांचे प्राण वाचवले, हे आम्ही विसरणार नाही. Wirur Student Rescue पोलिसांनी खरे अर्थाने मानवतेचे दर्शन घडवले," असे म्हणत अनेकांनी सामाजिक माध्यमांवरून विरुर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.


या घटनेत पोलिसांनी आपली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली हे खरेच, पण यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडतो.

  • या मार्गांवरील नाल्यांची स्वच्छता केली गेली होती का?
  • पूर येण्याची शक्यता असतानाही वाहतूक का सुरू ठेवली गेली?
  • शालेय वाहने सुरक्षित मार्गाने का पाठवली गेली नाहीत?

या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीतच, पण दरवर्षी असेच होत राहणार का? पावसाळ्यात मुलांचे प्राण धोक्यात टाकणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करणे अत्यावश्यक झाले आहे.


विरुर पोलिसांनी ज्या धाडसाने आणि तत्परतेने ही आपत्कालीन परिस्थिती हाताळली, ती खर्‍या अर्थाने "खाकीचे कर्तव्य" होते. Wirur Student Rescue प्रशासनाने मात्र यापासून धडा घेत, अशा घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. अन्यथा पुढील वेळेस नशिब इतकं साथ देईल याची काहीच शाश्वती नाही.


What happened on the Warur–Wirur road on July 23?
Due to heavy rainfall, floodwater submerged roads near Temburwahi and surrounding areas, stranding multiple vehicles including two school buses.
How many students were trapped and for how long?
Around 60 school students were trapped inside two buses for nearly three hours due to waterlogged roads.
Who conducted the rescue operation?
Virur Police, led by PI Santosh Wakde and his team, bravely entered floodwaters, provided water and biscuits, and successfully rescued all students.
Were there any casualties or injuries reported?
No, all students were safely rescued and dropped home by police by midnight without any injury or casualty.


#WirurStudentFloodRescue #WirurRescue #StudentSafety #FloodAlert #PoliceHeroism #MaharashtraRains #RajuraNews #FloodRescue #HeavyRain2025 #SchoolBusStranded #TimelyRescue #DisasterResponse #PoliceDuty #RuralFloodCrisis #BraveCops #RescueMission #Warur-WirurRoad #StudentProtection #ProudPolice #EmergencyResponse #WaterloggedRoads #PublicSafety #ChandrapurNews #RainUpdate #CivicNegligence #NaturalDisaster #SchoolChildrenRescued #FloodedRoads #MidnightRescue #PoliceService #RainChaos #RainDisaster2025 #FloodEmergency #StormWatch #RajuraFloods #CrisisManagement #HeroicAct #OnDutyPolice #MonsoonTrouble #FloodAwareness #StudentLivesSaved #RescueHeroes #LocalNewsUpdate #GratitudeToPolice #Monsoon2025 #RainRisk #RainImpact #EmergencyAlert #WirurUpdate #NoCasualties #PoliceInAction #RajuraNews #StudentNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top