रामपूरसह अनेक गावांचा राजुराशी दुवा खंडित; प्रशासन गप्प!
Bridge Submerged | राजुरा | भवानी माता मंदिर समोरील पुलिया आज २३ जुलै रोजी रात्रो ११ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसामुळे पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद झाली असून, राजुरा शहराचा रामपूर, गडचांदूर व इतर अंतर्गत गावांशी असलेला थेट संपर्क तुटला आहे. पाण्याची पातळी वाढत असून कोणतीही सावधगिरी न घेता प्रशासन मात्र अद्यापही झोपेत असल्याचे चित्र आहे.
या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ असते. Bridge Submerged अनेक विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि छोटे व्यावसायिकांचे दैनंदिन आवागमन याच मार्गावरून होते. परंतु सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि भवानी माता मंदिरासमोरील पुलावरून जोरदार पाण्याचा प्रवाह वाहू लागला. रात्री ११ च्या सुमारास हा पुलिया पूर्णतः पाण्याखाली गेला आणि त्याच क्षणी पोलिसांनी ब्यारिकेट लावत वाहतूक बंद केल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. "दरवर्षी हीच परिस्थिती असते, पण कुठलाही कायमस्वरूपी उपाय केला जात नाही. Bridge Submerged पावसाळा सुरू झाला की आमचे आयुष्य ठप्प होते," असे वक्तव्य रामपूर वासियाने केले आहें. त्यांनी असा आरोपही केला की, “मंदिरात लाखो रुपये खर्च करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या पुलाकडे पाहायला वेळच नाही.”
आपत्ती व्यवस्थापन कुंभकर्णी निद्रेत?
यासारख्या दुर्घटना वारंवार घडत असूनही, जिल्हा, तालुका प्रशासनाने कोणतीही तात्काळ उपाययोजना केली नाही. ना पर्यायी मार्ग, ना चेतावणी फलक, ना योग्य वाहतूक नियंत्रण – यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघात होण्याचा धोका सतत लटकत आहे.
तसेच, याठिकाणी ना चेतवन्या दिल्या गेल्या, ना वाहतूक पोलिसांची तैनाती झाली. Bridge Submerged रात्रीच्या अंधारात अनेक दुचाकीस्वारांनी पाण्यात अडकण्याचा धोका पत्करला. सुदैवाने जीवितहानी टळली, पण हे नशिबाने वाचलेले अपघात आहेत, नियोजनाचा भाग नाही.
स्थानिक प्रशासनाकडून केवळ मौन
या घटनेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, कोणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नव्हते. स्थानिक तहसील कार्यालय, पोलीस निरीक्षक व नगर परिषद प्रशासन या सर्वांनी परस्पर जबाबदारी झटकत नागरिकांना अंधारात ठेवले आहे.
भविष्याचा धोका अधिक मोठा
हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, या पावसामुळे अन्य मार्गही बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Bridge Submerged जर लवकरच प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर परिसरात अन्न, औषध व इतर अत्यावश्यक सेवा पोहोचवणे अशक्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहें.
जवाबदार कोण?
- पुलाचे डागडुजीसाठी किती निधी आला आणि कुठे गेला?
- दरवर्षी येणाऱ्या पावसाचा अंदाज असतानाही पूर्वतयारी का नव्हती?
- पूरनियंत्रण व वाहतूक नियोजनात प्रशासन वारंवार अपयशी का ठरते?
- पूल उंचावण्याचा अथवा नवीन पुलाची आवश्यकता असूनही तो प्राधान्य योजनेत का नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी देणे आवश्यक आहे. केवळ निवडणुकीच्या वेळेस मत मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता या समस्येची जाणीव करून देणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे.
दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो, दरवर्षी संपर्क तुटतो, आणि दरवर्षी प्रशासन ‘यंदा पावसाने आश्चर्यचकित केलं’ असं बिनडोक विधान करत हात वर करते. Bridge Submerged ही वृत्तीच बदलणं आवश्यक आहे. हा फक्त एक पुलिया नाही, तर प्रशासनाच्या बेफिकिरीचं आणि लोकप्रतिनिधींच्या प्राधान्य नसलेल्या धोरणाचं मूर्त उदाहरण आहे.
Why was the Bhavani Mata bridge in Rajura closed?
Which areas have been affected by this bridge closure?
Has the local administration taken any immediate steps?
What are the major public demands right now?
#Rajura #FloodAlert #BridgeSubmerged #TrafficDisruption #BhavaniMataBridge #Rampur #ChandrapurRains #MaharashtraFloods #HeavyRain2025 #MonsoonCrisis #DisasterManagementFail #RajuraBridge #PublicNegligence #RuralConnectivity #WeatherAlert #RainHavoc #VillageCutOff #NoResponseFromAdministration #RainEmergency #InfrastructureCollapse #PotholePolitics #RainDamage #EmergencyRajura #FloodWarning #NoAlternateRoute #AdministrationFailure #RuralRoads #DisconnectedVillages #PublicSafetyIgnored #BridgeCrisis #BridgeBlocked #Monsoon2025 #RainfallRajura #RajuraUpdate #HeavyRainfall #NoRescuePlan #WaterLogging #RainDisaster #FlashFloods #CitizensAngry #PublicDemand #RainAffectedAreas #BlockedRoute #PanchayatNegligence #TalukaIssue #FloodProneZone #PublicTransportHit #ZPNeglect #UrgentReliefNeeded #RescueDelay #RajuraNews #MahawaniNews