Shivshakti-Bhimshakti | शिवसेनेना राजकीय वाढदिवसाची वैचारिक जाणीव

Mahawani
0

Photograph taken while celebrating the birthday of Vicky Mahajan, who gave the Constitution

शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीचा संदेश संविधान वाटपातून देण्याचा आगळा उपक्रम

Shivshakti-Bhimshakti | चंद्रपूर | शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या ऐतिहासिक युतीनंतर "शिवशक्ति-भीमशक्ती" एकत्र आल्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा यासाठी शिवसेना चंद्रपूर तालुक्याच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारताच्या संविधान उद्देशिकांचे वाटप करून सामाजिक व वैचारिक जाणिवेचा संदेश देत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.


या उपक्रमाद्वारे शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती केवळ राजकीय वाटाघाटींपर्यंत सीमित नसून ती समाजप्रबोधन, संविधान जागृती आणि दलित, वंचित, शोषित समाजाच्या हक्कासाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याची तयारी असल्याचा संदेश दिला गेला. संविधान उद्देशिकांचे वाटप हे केवळ प्रतिकात्मक नव्हते, तर हे भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा पुनःप्रत्यय देणारे होते.


या युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतांना गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार आदी बाबतीत राबवलेल्या योजनांची प्रत्यक्ष फळे मिळत असल्याचा अनुभव जनतेला येत आहे. Shivshakti-Bhimshakti याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या दोन्ही पक्षांचा हा नैसर्गिक मिलाफ असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


या युतीत कोणत्याही अटी-शर्ती नव्हत्या, कोणत्याही लाभाच्या अपेक्षा नव्हत्या—फक्त सामाजिक समतेचा, घटनेच्या मूल्यमान्यतेचा आणि बहुजन हक्काच्या सन्मानाचा विषय होता. आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून ही राजकीय आणि सामाजिक लढाई अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेत शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे.


चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांत ही युती केवळ एक राजकीय घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात आहे, हे या कार्यक्रमावरून स्पष्ट होते. Shivshakti-Bhimshakti युवकांनी संविधानाचे मूल्य समजून घेतले पाहिजे, सामाजिक जाणिवा वाढविल्या पाहिजेत, आणि सत्ता म्हणजे केवळ सत्तेचा उपभोग नसून जबाबदारीची पूर्ण जाणिव ठेवून लोकांच्या हितासाठी काम करण्याची वृत्ती असावी, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.


राजकीय वाढदिवस साजरे करण्याची ढोबळ पद्धत मोडून टाकत संतोष पारखी यांच्या संकल्पनेतून विक्की महाजन यांनी संविधान उद्देशिकांचे वितरण करून समाजापुढे एक विधायक उदाहरण मांडले आहे. ही कृती केवळ राजकीय नव्हे, तर वैचारिकदृष्ट्याही प्रेरणादायी ठरली आहे.


या कार्यक्रमात शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, बल्लारपूर विधानसभा प्रमुख कृष्णाताई सुरमवार, घुग्घूस शहर प्रमुख महेश ढोंगे, तालुका संघटक संजयजी शिंदे, उपतालुका प्रमुख विक्की महाजन, अमोल टोंगे, मुक्कदर बावरे, उपमहा नगर प्रमुख विश्वास खैरे, सूचक दखने, युवासेना महानगर प्रमुख दीपक रेड्डी, भद्रावती महिला उपतालुका प्रमुख राधाबाई कोल्हे, युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, निखिल सुरमवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीचा सामाजिक प्रभाव स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. Shivshakti-Bhimshakti पुढील काळात ही युती केवळ निवडणूक यंत्रणांपुरती मर्यादित न राहता, तर गावपातळीवर समाजहितासाठी एकत्र येऊन काम करणारी शक्ती म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.


शिवशक्ती-भीमशक्तीच्या या युतीला सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा, युवकांचा आणि परिवर्तनाच्या वाटेवर असलेल्या नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळेल, हे या उपक्रमाने दाखवून दिले आहे.


What was the unique initiative taken by Shiv Sena in Chandrapur on Vikki Mahajan’s birthday?
Shiv Sena distributed the Preamble of the Indian Constitution as part of a socially conscious celebration to promote the Shivshakti-Bhimshakti alliance message.
Who were the key leaders present at the event?
The event saw participation from Santosh Parkhi, Minal Atram, Krishnaatai Suramwar, Mahesh Dhonge, and other senior Shiv Sena and Republican Sena leaders.
What is the significance of the Shivshakti-Bhimshakti alliance?
The alliance symbolizes the coming together of Shiv Sena and Republican Sena to carry forward the ideologies of Dr. Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray, promoting social justice and unity.
How is this initiative different from usual political celebrations?
Instead of typical celebratory events, Shiv Sena used the occasion to raise constitutional awareness and connect with citizens through distribution of the Indian Constitution’s Preamble.


#ShivshaktiBhimshakti #VikkiMahajan #ShivsenaChandrapur #EknathShinde #AnandrajAmbedkar #IndianConstitution #PreambleDistribution #BhimArmy #ShivsenaBirthday #PoliticalAlliance #Ambedkarite #PrabodhankarThackeray #AmbedkarThoughts #SocialJustice #DrAmbedkar #ConstitutionalAwareness #MaharashtraPolitics #ShivSenaEvent #YouthPolitics #BJP #ShindeFaction #ShivSenaWorkers #ChandrapurNews #ChandrapurPolitics #SocialUnity #RepublicanSena #ShivSenaRepublicanUnity #GrassrootPolitics #DalitEmpowerment #PoliticalAwareness #RajuraPolitics #ShivSenaLeaders #ChandrapurEvents #MaharashtraUnited #AmbedkarMission #PreambleForAll #ShivSenaUpdates #PoliticalUnity #VotersAwareness #DemocracyIndia #SocialReform #BhimShaktiZindabad #UnityInDiversity #PoliticalCelebration #ConstitutionIndia #YouthAwakening #PreambleReading #ShivSenaSupporters #MaharashtraUnitedFront #PoliticalNewsIndia #GrassrootsMobilization #ChandrapurNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top