Dr. Suchita Dhande Farewell | हुद्दे बदलतात परंतु कार्याचे स्मरण नेहमी असते

Mahawani
0

Dr. Suchita Dhande Farewell: राजुरा | तालुक्यातील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे आजचा दिवस एका सन्माननीय अधिकारीच्या आठवणींनी भारलेला होता. आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे संपूर्ण तालुक्यात आदराने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुचिता धांडे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन (राजुरा), यांची प्रशासकीय बदलीनिमित्य भावपूर्ण निरोप समारंभ मोठ्या आत्मीयतेने पार पडला.

कर्तव्यदक्ष डॉ. सुचिता धांडे यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

Dr. Suchita Dhande Farewell: राजुरा | तालुक्यातील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे आजचा दिवस एका सन्माननीय अधिकारीच्या आठवणींनी भारलेला होता. आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे संपूर्ण तालुक्यात आदराने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुचिता धांडे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन (राजुरा), यांच्या प्रशासकीय बदलीनिमित्य भावपूर्ण निरोप समारंभ मोठ्या आत्मीयतेने पार पडला.


वर्ष २०२२ मध्ये जेव्हा लम्पी (lampi) स्किन या जीवघेण्या रोगाने राज्यभरात थैमान घातला होता, तेव्हा अनेक भागांत पशुधन मृत्युमुखी पडत होते. Dr. Suchita Dhande Farewell पण राजुरा तालुक्यात हा धोका कडेकोट प्रयत्नांनी थोपवण्यात आला आणि यामागे डॉ. सुचिता धांडे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व ठळकपणे उठून दिसले.


त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाली. आजही पशुपालक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग ह्या मोहिमेची आठवण मोठ्या अभिमानाने करतो. Dr. Suchita Dhande Farewell आपल्या अधिकारीपदाचा उपयोग ‘फाईली ढकलण्यासाठी’ न करता, मैदानी हजेरी लावणाऱ्या व समस्यांशी थेट झुंजणाऱ्या डॉ. धांडे यांचे काम प्रेरणादायी ठरले.


कार्यक्रमात सौहार्द, आदर आणि प्रेरणा

आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. नरसिंग तेलंगे (Dr. Narsingh Telange) (प्रभारी सहायक आयुक्त, पशुसंवर्धन) यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद जल्लेवार (Dr. Pramod Jallewar) (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, चंद्रपूर) आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप मामा म्हेसने हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भाग्यश्री बेलसरे आणि श्री. काशीनाथ झाडे यांनी संयत आणि समर्पक पद्धतीने पार पाडले. तर श्री. कैलास राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.


डॉ. धांडे यांनी आपल्या भाषणात जेव्हा सांगितले की, "पशुसंवर्धन विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असूनही काही वेळा दुर्लक्षित राहतो; तरीही सेवाभाव सोडू नका," तेव्हा उपस्थित कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.


उपस्थित मान्यवरांची मतमांडणी

प्रमुख पाहुणे डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व डॉ. धांडे मॅडम यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


उपस्थितांचा सहभाग

कार्यक्रमाला डॉ. कार्तिक कांगटे, सौ. कृती सोनटक्के (आपुलकी फाउंडेशन) यांच्यासह विभागातील विविध पशुधन अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. धांडे यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कर्तव्यकठोरतेची पाठशाळा — डॉ. धांडे!

अनेक सरकारी अधिकारी फक्त कार्यालयीन वेळ पार करण्यापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवतात, मात्र डॉ. सुचिता धांडे (Dr. Suchita Dhande) यांनी आपल्या पदाचा उपयोग सामान्य शेतकऱ्यांच्या गाई–म्हशींसाठी, शेळ्या–मेंढ्यांसाठी, गरजू जनतेसाठी केला. Dr. Suchita Dhande Farewell जिल्हा प्रशासनाने ह्या अधिकारीचे अधिकृतपणे गौरव करण्याची वेळ आली आहे.


कार्यक्षेत्रात महिला अधिकारी असल्यामुळे अनेकदा त्यांना “सॉफ्ट टार्गेट” मानले गेले, पण डॉ. धांडे यांनी त्या सर्व गैरसमजांना आपल्या कार्याने खोडून काढले. त्यांचा वावर हा केवळ ‘दायित्व’ नव्हे, तर ‘दैनंदिन समर्पण’ होता.


प्रशासनाला थेट प्रश्न

  • लम्पी संकटाच्या काळात जेव्हा अनेक जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा राजुरात ती मजबूत राहिली – याचे श्रेय कुणाला?
  • अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदल्या करताना, त्यांच्या अनुभवाचा योग्य उपयोग पुढे कुठे होणार?
  • राज्य प्रशासनाने अशा उदाहरणार्थ अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर कौतुकपत्र का दिलेले नाही?


डॉ. सुचिता धांडे यांची बदली ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी राजुरा तालुक्याच्या इतिहासात त्यांच्या कार्यकाळाची नोंद कर्तव्यदक्षतेचा आदर्श म्हणून नेहमी राहणार आहे.

कर्तव्य कसोटीच्या काळात जो पाठी फिरवत नाही, तोच खरा सेवक असतो. हेच  डॉ. धांडे यांनी हे सिद्ध केलंय!


Who is Dr. Suchita Dhande and why is she being honored?
Dr. Suchita Dhande is a dedicated veterinary officer who was honored during her farewell for her outstanding service, particularly during the Lumpy Skin Disease crisis.
What major contribution did Dr. Dhande make during her tenure?
She successfully led a 100% vaccination campaign against Lumpy Skin Disease in Rajura, protecting the livestock and livelihoods of countless farmers.
What message did Dr. Dhande share during her farewell?
She emphasized that veterinary services are essential and should not be treated as secondary, urging fellow officers to continue serving with dedication despite challenges.
Who were the key guests present at the farewell event?
The event was attended by Dr. Narasing Telange, Dr. Pramod Jallewar, Dilip Mama Mhesane, and several veterinary and community representatives.


#DrSuchitaDhande #AnimalWelfare #LumpySkinDisease #VeterinaryHero #PublicHealth #AnimalHealth #RuralHealthcare #RajuraNews #ChandrapurUpdates #LumpyControl #VeterinaryDepartment #InspiringOfficers #GovernmentService #FarewellCeremony #WomenInLeadership #VeterinaryDoctor #DepartmentalTransfer #ServiceWithDedication #DiseaseControlSuccess #VeterinaryIndia #RajuraHeroes #LumpyWarrior #DistrictAdministration #ChandrapurDistrict #MaharashtraNews #OfficerFarewell #AdministrativeDuty #GrassrootsLeadership #RuralVeterinaryCare #PublicServiceMatters #WomensEmpowerment #RajuraEvents #AnimalRights #GovernmentDuty #DoctorOnDuty #FieldLeadership #HealthcareWarrior #ChandrapurEvents #LumpyVaccination #ServiceRecognition #LumpyAwareness #HonestOfficer #VeterinaryAwareness #StrongLeadership #CommunityHealth #AnimalCare #OfficialFarewell #TributeToService #RajuraUpdates #PublicServiceHero #कर्तव्याची_मुल्यं #पशुसंवर्धनचे_खरे_चेहरे #राजुराची_गौरवगाथा #सुचिता_धांडे_यांचा_मुजरा #लम्पीच्या_विरोधात_जिंकलेली_लढाई #MarathiNews #Batmi #ChandrapurNews #RajuraNews #Dr.SuchitaDhandeFarewell

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top