सुरक्षारक्षकांना ठार धमक्या देत ८० हजारांचा मुद्देमाल लंपास; वाढत्या चोऱ्यांनी खाणीतील कामगार संतप्त
राजुरा: डब्ल्यूसीएल सास्ती कोळसा खाणीतील ६६ केव्ही सबस्टेशनमध्ये Wcl 66 kV Substation ३० एप्रिलच्या पहाटे घडलेली सशस्त्र चोरीची घटना ही केवळ चोरी नव्हे, तर कोळसा उद्योगातील सुरक्षेच्या विफलतेवरचा करारा तमाचा आहे. WCL Sasti Robbery ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून सुरक्षा व्यवस्थेची पूर्णतः खिल्ली उडवत तब्बल ८० हजार रुपयांचा इलेक्ट्रिक मुद्देमाल – बुशिंग व बारपट्टी – लंपास केला. या घटनेने वेकोली (WCL) आणि पोलिस प्रशासन दोघांचीही कार्यक्षमता आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास, जबाबदार सुरक्षेच्या छायेखाली असलेल्या सास्तीच्या सबस्टेशनमध्ये चोरटे मोठ्या निर्धोकतेने शिरले. "आमच्यासमोर तलवार होती, तोंड बांधलेले होते, आणि ते आम्हाला शांत बसवून मुद्देमाल घेऊन गेले," असे असिस्टंट मॅनेजर वीरेंद्र कुमार शर्मा Virendra Kumar Sharma यांनी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले. ही केवळ चोरी नव्हे, तर सुरक्षेच्या नावाखाली चालणाऱ्या ढिसाळ व्यवस्थेचे भयावह उदाहरण आहे.
सर्व CCTV निकामी – पुराव्यांचा फज्जा
चोरट्यांनी अगदी योजनाबद्धपणे सुरक्षारक्षकांना ठार धमक्या दिल्या आणि सबस्टेशनमधील CCTV कॅमेऱ्यांच्या वायरही छाटल्या. यावरून हे स्पष्ट होते की, या चोरट्यांना परिसराची माहिती होती आणि कोणताही पुरावा मागे न राहण्यासाठी त्यांची पूर्वतयारी भक्कम होती. त्यामुळे हे एक 'इन्साईड जॉब' तर नाही ना, असा संशय उपस्थित होतो.
गुन्ह्याची नोंद, तपासाची चक्रे सुरू – पण किती परिणामकारक?
राजुरा पोलिसांनी Rajura Police भारतीय दंड विधान कलम ३९५ (दरोडा), तसेच शस्त्र अधिनियम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. WCL Sasti Robbery समोरील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार PSI Hemant Pawar करत असून, त्यांना चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. परिसरातील CCTV फुटेज, गुप्त माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी २ मे रोजी तीन आरोपी सह एक तलवार आणि मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे सांगण्यात येते.
सवाल अनेक – जवाबदार कोण?
- खाणीत वीज केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत इतकी ढिलाई का?
- WCL प्रशासनाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था असूनही चोरटे इतक्या निर्धोकतेने आत शिरले कसे?
- CCTV फुटेजचा आधार असतानाही तपास इतका संथ का?
- सास्ती पोलिस चौकी केवळ नावापुरती का?
खाणीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्यांनी वेकोलीच्या व्यवस्थापनाचा विश्वासपात्र पार खिळखिळा
हे पहिले प्रकरण नाही. कामगारांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सास्ती खाणीत मागील काही महिन्यांत अनेक वेळा विविध प्रकारच्या वस्तूंची चोरी झाली आहे. WCL Sasti Robbery काही प्रकरणात चोरीच्या वस्तू चोरांपर्यंत पोहोचल्याचे पुरावे असूनही, दोषींवर कठोर कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.
कामगारांचे म्हणणे स्पष्ट आहे – "पोलीस चौकी असून काय उपयोग? जेव्हा चोर संध्याकाळीच योजनाबद्ध येतात आणि तलवारी दाखवून लूट करतात!"
वेकोलीच्या सुरक्षिततेला सुरुंग : खाजगी सुरक्षा एजन्सी की थेट पोलिस बंदोबस्ताची गरज?
वेकोलीसारख्या उद्योगात एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी केवळ खाजगी सुरक्षा एजन्सींवर विसंबून राहणं हे अत्यंत धोकादायक आहे. आज हे चोर आले, उद्या मोठा गट स्फोटकांसह घुसला तर? याचा कोण जबाबदार?
कामगारांचा स्पष्ट सवाल – "खाजगी सुरक्षा मोजून पगार घेते, पण जबाबदारी कुणाची? वेकोली की पोलिस?"
प्रशासनाला थेट जबाबदारी – केवळ गुन्हा दाखल करून हात झटकणे पुरेसे नाही
या घटनेने वेकोली आणि पोलिस दोघांच्याही कारभारातील त्रुटी उघड केल्या आहेत. WCL Sasti Robbery केवळ तपास सुरू आहे, असे सांगून वेळ मारून नेणे, ही खाणीत काम करणाऱ्या शेकडो कामगारांच्या सुरक्षिततेशी प्रतारणा आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपाययोजना तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे.
कामगार संघटनांची संतप्त प्रतिक्रिया : "कितीवेळा सहन करायचं?"
वेकोलीतील कामगार संघटनांनी प्रशासनासमोर थेट मागणी केली आहे :
- खाणीत पोलिस बंदोबस्त कायमस्वरूपी करावा
- सर्व CCTV प्रणाली अद्ययावत करून वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित करावी
- गुप्तचर विभागाच्या माध्यमातून गुप्त कारवाईत वाढ करावी
- चोरी झालेल्या भागांची काळ्या बाजारातील विक्री थांबवण्यासाठी व्यापाऱ्यांवरही कारवाई करावी
हा फक्त एक गुन्हा नाही, ही सुरक्षेवरील विफलतेची सार्वजनिक कबुली आहे
ही घटना वेकोली आणि पोलिस दोघांसाठीही एक चेतावणी आहे. WCL Sasti Robbery खाणीत कोळसा काढण्यासाठी प्रचंड यंत्रणा आणि खर्च केला जातो, पण सुरक्षिततेच्या बाबतीत झालेली ही बेपर्वाई भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते. आता वेळ आली आहे, की प्रशासनाने "आम्ही काय करू?" असा पवित्रा न घेता "आम्ही हे थांबवणारच" असा निर्धार जाहीरपणे दाखवावा.
What happened at the WCL Sasti substation in Rajura?
Was anyone harmed during the robbery?
What action has been taken by the police so far?
Why are WCL workers demanding stronger security?
#WCLSastiRobbery #SastiTheft #ChandrapurCrime #CoalMineSecurity #WCLNews #RajuraPolice #ArmedRobbery #SubstationTheft #CoalIndia #WCLUnderAttack #WCLManagement #WCLChandrapur #SastiSubstation #ElectricEquipmentTheft #CCTVWiresCut #CoalSectorCrisis #SecurityBreach #MiningAreaCrime #WCLChor #PoliceNegligence #MiningMafia #ChandrapurDistrict #CoalIndiaNews #WCLScam #PublicSectorSafety #ChorRajura #WCLSecurityFailure #TelescopicTheft #NightRobbery #WCLUnderThreat #CoalPowerLoot #WCLPowerTheft #CoalWorkersVoice #WCLStrikeThreat #ChandrapurAlert #IPSFailure #SecurityAtRisk #IndiaRobberyAlert #CoalMinesInDanger #MiningSabotage #CoalIndustryCrisis #SabotageSasti #NightCrimeWCL #PoliceAccountability #BreachOfTrust #PowerGridRobbery #CrisisInWCL #WCLCoalTheft #MiningSectorAlert #SastiIncident #IndiaNews #WCLSastiRobbery