बाबापूरमध्ये अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
राजुरा : आज दुपारी ३:३० च्या सुमारास बाबापूर गावात अचानकपणे लागलेल्या भीषण आगीमुळे गावात मोठी खळबळ उडाली. Babapur Fire Incident सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावातील शेतकऱ्यांनी मेहनतीने साठवून ठेवलेला जनावरांचा चारा, कापूस, कडबा आणि गोदाम पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार शॉर्टसर्किट किंवा कोरड्या चाऱ्याला लागलेली ठिणगी यामुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळी आग झपाट्याने पसरली आणि पाहता पाहता तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. Babapur Fire Incident यात रंजू गौरकार, किसन वनकर यांचे शेकडो क्विंटल कुटार, कडबा व गोदाम तसेच हिराजी मिलमिले यांचा ५० क्विंटल कापूस, गोदाम आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या चाऱ्यावर शेतकऱ्यांची जनावरे अवलंबून होती. उष्णतेच्या तीव्रतेमुळे आसपासच्या झाडाझुडपांनाही नुकसान झाले.
नगर परिषद, राजुरा येथील अग्निशमन विभागाचे उल्लेखनीय कार्य
ग्रामपंचायत सदस्य श्री. विर पुणेकर यांनी घटनेची माहितीहोताच अग्निशमन विभागाशी संपर्क साधताच नगर परिषद, राजुरा येथून अग्निशमन विभागाचे वाहन तत्काळ रवाना करण्यात आले. वाहन काहीच मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाचे वाहनचालक राजदीप येलपुले, फायरमन राहुल रतनकर यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग अधिक पसरण्यापासून रोखता आली आणि गावात मोठ्या प्रमाणात हानी टळली.
गावकऱ्यांचे प्रशासनावर टीकास्त्र
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून "जागेवर अग्निशमन व्यवस्था नसणे ही गंभीर लापरवाही आहे" असा आरोप केला जात आहे. Babapur Fire Incident गावात दरवर्षी उन्हाळ्यात अशी आग लागण्याची शक्यता असताना, स्थानिक यंत्रणा आग विझवण्याच्या दृष्टीने सज्ज नाहीत हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
शेतकरी भरकटले; नुकसान भरपाईची जोरदार मागणी
या आगीत जवळपास ५ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात १. किसान वनकर, २. हिराजी मिलमिले, ३. रंजू गौरकार यांच्या जनावरांचे अन्न पूर्णपणे जळून गेल्यामुळे आगामी आठवड्यांमध्ये जनावरांच्या देखभालीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
"सारं वर्षभर साठवलेला कुटार, कडबा आगीने नेला. आता जनावरांना काय घालायचं?" असा सवाल करीत गावातील शेतकरी शासनाकडे तातडीच्या नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
सरपंच आणि ग्रामस्थांनी अग्निशमन पथकाचे केले कौतुक
घटनास्थळी तातडीने धाव घेतलेल्या अग्निशमन पथकाचे गावकऱ्यांनी जाहीर कौतुक केले आहे. Babapur Fire Incident सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी संयुक्तरित्या अग्निशमन विभागाला प्रशंसापत्र देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाने अशा सेवा भविष्यातही तत्काळ द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रशासन जबाबदार की सिस्टीम कुचकामी?
या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत:
- गावांमध्ये स्थानिक पातळीवर अग्निशमन सुविधा का नाहीत?
- आग लागल्यानंतर पोलीस व महसूल यंत्रणा कुठे होत्या?
- ग्रामपंचायतीकडे आगीत होणाऱ्या जोखमीसाठी कोणती पूर्वयोजना आहे का?
- शेतकऱ्यांना तातडीने मदत का दिली जात नाही?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने त्वरित द्यावी लागतील. शेतकऱ्यांचा चारा जळणे ही फक्त आर्थिक बाब नाही, तर त्यांच्या संपूर्ण उपजीविकेवरचा थेट आघात आहे.
📌 मागण्या खालीलप्रमाणे जोर धरत आहेत:
- तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी
- चारा उपलब्ध करून द्यावा
- गावात अग्निशमन यंत्रणा व जलसाठा उभारण्यात यावा
- भविष्यातील घटनांना रोखण्यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण व आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी
ही आग ही केवळ एक अपघात नव्हे, तर प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे व ग्रामीण भागातील मूलभूत संरचनांच्या अभावाचे स्पष्ट लक्षण आहे.
गावकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या आता केवळ लेखी Babapur Fire Incident आश्वासनांवर थांबणार नाहीत—कारवाई हवी, निर्णय हवेत आणि शेतकऱ्यांच्या जळून गेलेल्या चाऱ्याच्या राखेतून नव्या योजनांचा ठोस आराखडा हवा.
What exactly happened in Babapur village?
Was the fire brought under control quickly?
What kind of losses did the farmers suffer?
What are the villagers demanding from the administration?
#BabapurFire #ChandrapurNews #RajuraTaluka #FireAccident #FarmerLoss #FodderBurnt #CattleFeedCrisis #FireBrigadeRajura #MaharashtraFires #RuralDisaster #AgriLoss #FarmerRights #DisasterRelief #CompensationDemand #NoCasualty #FireSafety #RuralFireAlert #ChandrapurDistrict #BreakingNews #FireOutbreak #EmergencyResponse #AgricultureLoss #FireTragedy #VillageNews #MaharashtraNews #FarmerIssues #FireDepartment #TimelyAction #FireDamage #SupportFarmers #RuralCrisis #AgriWoes #AnimalFeedLoss #StorageBurnt #FireAlert #LocalNewsIndia #GramPanchayat #DisasterManagement #FireSafetyIndia #FodderCrisis #PublicDemand #GovernmentAid #FarmerVoice #RajuraFire #NewsUpdate #VillageFire #FireAccidentIndia #ChandrapurUpdate #NewsBuzz #EmergencyHelp