Chandrapur election : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा, वडेट्टीवारांचे अपवादात्मक यश

Mahawani

राजुरा ते चिमूर: भाजपचा विजय, काँग्रेसला ब्रम्हपुरीत दिलासा


चंद्रपूर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखत पाच मतदारसंघांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला फक्त ब्रम्हपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून यश मिळाले. या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय Chandrapur election समीकरणे स्पष्ट केली आहेत.


भाजपने राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा आणि चिमूर या पाचही मतदारसंघांवर विजय मिळवला. देवराव भोंगळे (राजुरा), सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), करण देवतळे (वरोरा), आणि बंटी भांगडिया (चिमूर) यांनी प्रभावी कामगिरी करत मतदारांचा विश्वास संपादन केला. या यशामागे भाजपच्या ‘लाडकी बहिण योजना’चा मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे सांगत आहे. महिलांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या या योजनेने ग्रामीण भागातील महिला मतदारांना आकर्षित केले आहे. महिलांसाठी आर्थिक स्थैर्य आणि मदतीच्या वचनामुळे ‘लाडकी बहिण योजना’ ग्रामीण तसेच शहरी महिलांमध्ये लोकप्रिय ठरली. महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय, त्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांनी त्यांना भाजपकडे वळवले असल्याचे दिसून येत आहे.



      


  • राजुरा – देवराव भोंगळे: ७२८८२ मते

राजुरा येथे देवराव भोंगळे यांनी विजय मिळवला. त्यांनी सुधीरभाऊ सेवा केंद्र, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर भर दिला. त्यांचा साधा आणि लोकाभिमुख प्रचार निर्णायक ठरला.


  • बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार: १०५९६९ मते

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे या क्षेत्रात विकासाच्या योजना राबवण्यात यश आले. अर्थव्यवस्थेतील त्यांचा अनुभव आणि सुलभ प्रशासकीय शैलीमुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.


  • चंद्रपूर – किशोर जोरगेवार: १०६८४१ मते

किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, अम्माचा टिफिन आणि वाहतूक व्यवस्थेवर त्यांनी दिलेला भर मतदारांना भावला.


  • वरोरा – करण देवतळे: ६५१७० मते

करण देवतळे यांनी वरोरा मतदारसंघात भाजपा ताब्यात ठेवत यश मिळवले. त्यांनी स्थानिक गरजांवर आधारित योजनांद्वारे जनतेशी संपर्क साधला.


  • चिमूर – बंटी भांगडिया: ११६४९५ मते

चिमूरमधील बंटी भांगडिया हे युवा नेतृत्व असून त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे आणि जोमदार प्रचारामुळे विजय मिळवला.


  • ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस): ११४१९६ मते

जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीत विजय मिळवला. सामाजिक न्याय आणि स्थानिक विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा मतदारांनी आदर राखला. त्यांच्या विरोधकांवर मात करत त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व सिद्ध केले.


अधिक वाचा: कढोलीत पैशांचा खेळ उघड; भाजप प्रचारकाला पकडले रंगेहात


या निकालांवरून चंद्रपूर जिल्ह्यात Chandrapur election भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मात्र, काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून ब्रम्हपुरीत आपले अस्तित्व टिकवले आहे. भाजपच्या उमेदवारांनी पायाभूत विकास आणि जनसंपर्कावर भर दिला, तर वडेट्टीवार यांचा सामाजिक न्यायासाठीचा लढा मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला.


चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निकाल भाजपसाठी उत्साहवर्धक असून काँग्रेसला पुनरुत्थानासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. विजय वडेट्टीवार यांचे यश काँग्रेससाठी प्रेरणादायी ठरू शकते, तर भाजपसाठी हा विजय जबाबदारीची जाणीव वाढवणारा आहे.


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Bramhapuri #Ballarpur #Warora #Chimur #MaharashtraPolitics #AssemblyElections #ElectionResults #BJP #Congress #VijayWadettiwar #SudhirMungantiwar #DeoraoBhongale #KishorJorgewar #KaranDevtale #BuntyBhangdiya #PoliticalAnalysis #VidarbhaPolitics #MaharashtraAssembly #LocalIssues #DevelopmentAgenda #LeadershipMatters #VoterDecision #ElectionHighlights #ChandrapurLeaders #PoliticalTrends #AssemblyWinners #ElectionImpact #ConstituencyDevelopment #MarathiJournalism #ChandrapurUpdates #PoliticalLeadership #BJPLeaders #CongressVictory #VidarbhaUpdates #MahawaniExclusive #ElectionInsights #ChandrapurElections #DevelopmentFocus #PoliticalChallenges #LocalRepresentation #VidarbhaNews #DemocraticVictory #Chandrapurelection

To Top