वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन !

Mahawani


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करून जनतेसाठी उघडण्याची विनंती !



महावाणी - विर पुणेकर
०६ ऑगस्ट २०२४

बल्लारपूर : वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर तर्फे माननीय विशाल वाघ ( vishal wagh )मुख्याधिकारी, नगरपरिषद बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करून जनतेसाठी उघडण्याची विनंती करण्यात आली. ( Principal, Municipal Council Ballarpur )


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जुनी नगरपरिषद चौक, बल्लारपूर येथे स्थित आहे. मागील जून महिन्यापासून या पुतळ्याची दुरुस्ती सुरू आहे, परंतु तीन महिने उलटूनही काम पूर्ण झाले नाही. या परिस्थितीत, नगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुतळा जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामान्य जनतेसाठी प्रेरणादायी असून शहराच्या मुख्य भागात स्थित आहे. पुतळा बंद राहिल्याने लोकांच्या भावनांचा आदर राखला जाईल व दर्शनाची निराशा होणार नाही, यासाठी पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.


या निवेदनाच्या वेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, जिल्हा सदस्य अश्विन शेंडे, सुदेश शिंगाडे, शहर सदस्य शुभम सोनटक्के, सोहन वनकर, सागर गेडाम आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ( mahawani ) ( ballarpur ) ( dr. babasaheb ambedkar )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top