वेकोलि सुरक्षा रक्षक सोहेल खान बेपत्ता.


घटनास्थळी सोहेल खानचा मोठया जोमाने शोध सुरु.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२५ मे २०२४

राजुरा/गोवारी कॉलनी : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सास्ती व्यवस्थापक क्षेत्राच्या खुल्या खदाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेला सोहेल खान (Sohail Khan) हा काल दुपारी ०४:०० वा आपल्या कामावर गेला व ०८:०० च्या सुमारे आपले दोन सहकारी सुरक्षा रक्षक सोबत घेऊन खदानीत दस्त घालण्या करीता गेला होता. सोहेल सोबत गेलेले दोन सहकारी सुरक्षा रक्षक परत आले परंतु कामाची वेळ संपून १२:०० वाजून गेले तरीही सोहेल घरी परतला नसल्याची माहिती सोहेलच्या घरच्या कडून मिळत आहे.

    सोहेल सोबत दस्त घालण्या करीता गेलेले दोन सुरक्षा रक्षक परतले परंतु सोहेल परतला नाही. सोहेल ज्या दोन सुरक्षा रक्षका सोबत खदानीत दस्त घालण्या करीता गेला होता ते सुरक्षा रक्षक सोहेलची सात सोडून गेले कुठे ? जेव्हाकी सुरक्षा रक्षकांना सदर क्षेत्रात चोरट्यांचा मोठा वावर असल्याची उत्तम माहिती असूनही सोहेलची सात सोडून जाणे हे संशय निर्माण करणारी बाब असल्याचे स्थानिक व कर्मचारातून बोलले जात आहे.

    सोहेल व सहकारी सुरक्षा रक्षक खदानीत डम्पिंग क्षेत्रात दस्त घालण्या करीता गेले होता सदर क्षेत्रात सध्या मोठया प्रमाणात माती डम्प केली जात असून सोहेल त्याच क्षेत्रात दस्त घालत असल्याने वेकोलि (WCL) प्रशासना कडून सदर क्षेत्रात काल डम्प केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात सोहेलचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. (MAHAWANI) (rajura) (gowari colony) (wcl) (sasti)

To Top