कढोली (बु.) - बाबापुर क्षेत्रात वाळू तस्करी जोमात
२३ मे २०२४
राजुरा/बाबापुर : कढोली (बु.) क्षेत्रात मागील काही दिवसा पूर्वी अवैध वाळू तस्करावर प्रशासनाने कारवाई करत दोन वाळू तस्करांना गंजा आळ केल्याने क्षेत्रीय वाळू तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले होते. परंतु कालांतराने महसूल विभाग व प्रशासनाचे सदर क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळू तस्कर पुन्हा त्याच धाडसाने डोके वर काढत आहे.
याचेच उदाहरण काल रात्रौ ०७:२२ वाजता बाबापुर येथे कढोली (बु.) येथील कृषीउत्पन्न बाजार समिती, राजुराचे संचालक तथा माजी सरपंच कढोली (बु.) राकेश हिंगाने (Rakesh Hingane) यांचे वाहन क्रमांक. MH-34-CD-3582 याने अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहून बाबापुर गावात वाळू तस्करी करण्यात आली आहे. (Kadholi (bk) Sand smuggling is in full swing in Babapur area)
सदर इसम संविधानिक पदावर असून महसूल बुडवत असल्याने आश्यर्य व्यक्त होत आहे. तसेच गुंड प्रवृत्तीने स्थानिक पत्रकाराला त्यांच्या घरी जाऊन जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने पत्रकारांचा जीव धोकायत आला आहे. प्रशासनाच्या सौम्य कारभाराने गुंडप्रवृत्ती व अवैध व्यावसायिकांचे धाडस वाढत असल्यांचे चित्र दिसून येत आहे. महसूल विभागाने छयाचित्रित पुराव्या नुसार मौका पंचनामा करून सदर वाळू तस्करावर तात्काळ कारवाई करण्याची मांग स्थानिकातून होत आहे. (mahawani) (babapur) (kadholi Bk)