कढोली-हडस्ती क्षेत्रातून भल्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन.

Mahawani


स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, देखील सहकार्य करत आहे कि काय?


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०४ एप्रिल २०२४

चंद्रपूर/राजुरा : सास्ती पोलीस चौकी क्षेत्रातील कढोली (बु.) तसेच चंद्रपूर पोलीस हद्दीतील हडस्ती क्षेत्रातील वर्धा नदी पुला खाली विसापूर पाणी टांकी जवळ स्थानिक ट्रॅक्टर धारकांकडून मोठ्या प्रमाणात अवैध बाळू उत्खनन केले जात आहे. हडस्ती-कढोली (बु.) पुला खालून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून वर्धा नदीच्या पात्राला अक्षरशा खिंडार पाडल्याचे पाहायला मिळत आहे.  स्थानकातून वारंवार तक्रारी करून देखील प्रशासना कडून कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. प्रशासनातील काही अधिकारीच सदर वाळू तस्करीला सहकार्य करत असून वाळू तस्करांनी यातून मोठे घबाड जमवून अधिकारी, कर्मचारी यांचे तोंड गोड केले असल्याचे स्थानकातून बोलले जात आहे.

        कढोली (बु.) - हडस्ती या दोन्ही गावाच्या मध्य असलेली वर्धा नदी हे सध्या कोरडाईच्या मार्गावर असल्याने नदीचे पात्र वाळू तस्करांना मोकळे झाले आहे. सध्या रेती घाट लिलाव झाला नसल्यामुळे स्थानिक व नजीकच्या गावातून घर बांधकामा करीता वाळू ची मोठी मांग तसेच इतर शासकीय, निम शासकीय व खासगी कंत्राटदार देखील याचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्धा नदीच्या पात्रारातून जे. सी. बी. व मजुराच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू (रेती) उत्खनन करून विक्री केली जात असून याचे पडसाद वर्धा नदीच्या पात्रात पाहायला मिळत आहे.

        आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून प्रशासना कडून कुठली हि कारवाई होत नसल्याने इतर वाळू तस्करांची हिम्मत उंचावली आहे. आज वाळू तस्कर कमालीचे मुजोर झाल्याने त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांच्या गेम करायला देखील मागे पुढे पाहणार नाही असे त्यांच्या वागणुकीतून दिसत आहे. याला स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, देखील सहकार्य करत आहे कि काय ? अशी शंका निर्माण होते कारण भर दिवसात नागरिकां समोरून ट्रॅक्टर मधून भर टच्चं वाळू भरून जात असून ते नागरिकांच्या निदर्शनात येतात परंतु स्थानिक पदाधिकारी यांच्या निदर्शनात येत नाही हे संशयास्पद आहे. 

        काही दिवसा आधी मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी जिल्ह्यात होत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा घाल्याने आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा झपाटा लावला होता यात कित्तेक अवैध रेती तस्कर, सुगंधित तंबाखू, मादक पदार्थावर कारवाई करण्यात आली होती. याने संपूर्ण जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते परंतु कालांतराने स्थानिक गुन्हे शाखेने नरमाई घेतल्याने अवैध व्यावसायिक त्याच झपाट्याने व्यवसायाकडे वळून धुमाकूड घातला आहे. सदर रेती उत्खननाकडे महसूल विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस प्रशासन लक्ष देतील काय? असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहे. (mahawani) (kadholi Bk) (rajura) (chandrapur) (hadasti)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top