अवघ्या १० दिवसात चंद्रपूर पोलिसां कडून ए. टि. एम. फोडणार्यांना हैद्राबाद येथून घेतले ताब्यात.

 

एक आरोपी समेत १४,००००० /- रुपये किमतीची (थार) काळया रंगाचे चार चाकी वाहन व २०० /- रू. किमतीची स्प्रे बॉटल असे एकूण १४,००२००/- रुपयाचा मुद्दे माल जप्त. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० एप्रिल २०२४

चंद्रपूर : ३१ मार्च रोजी अतुल कावळे (Atul Kawle) नामक व्यक्ती ने पोलीस स्टेशन, रामनगर पोस्टला तक्रार दिली होती की, दिनांक २८ मार्च २०२४ रोजी नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन ड्युटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए. टि. एम. ( of Bank of India near Bengali Camp Chowk, Durga Mata Temple. A.T. M) मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहणी केली असता ए.टि.एम. मधुन जोर-जोराने सायरनचा आवाज येत होता तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही कॅमे-यावर स्प्रे मारून कॅमे-याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. फिर्यादीच्या अशा तोंडी तक्रारी वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र. अप.क्र. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून नमुद गुन्हयाचे तपासा दररम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे (Police Inspector Sunil Gade), यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक येथील अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी रवाना झाले. 

        गुन्हे शोध पथकानी तात्काळ घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले असता, एका काळ्या रंगाच्या थार मध्ये काही अज्ञात इसम ए. टि. एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा मा. पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार (S.I Madhukar Samalwar) तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पोउपनि सामलवार यांचे पथक सी.सी. टि. व्हि. फुटेज पाहत काळ्या रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद (Nagpur, Hyderabad) येथे जावुन थार गाडी व आरोपीतांचा शोध घेत आरोपी नामे हुसेन अली (Hussain Ali) (२१), रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केले असता, त्यांने १) मो. आमीर उर्फ अरमान मलीक (Md. Aamir aka Armaan Malik) रा. हैद्राबाद, २) तरसी उर्फ तस्लीम उदय खान (Tarsi aka Tasleem Uday Khan) (२६) रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, ३) राशीद खान (Rashid Khan) रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य - हरियाणा (Haryana), ४) सल्ली उर्फ सलमान (Salli vs Salman) रा. भोंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडन्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद याचा हैद्राबाद येथे शोध घेतला असता मिळुन आला नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आले नाही. गुन्हयातील आरोपी नामे तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय २६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरुग्राम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. 

        नमुद गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयात वापरलेली काळ्या रंगाची थार गाडी हैद्राबाद येथुन किरायाने घेवुन वेगवेगळ्या नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडुन एक काळ्या रंगाची थार (Black thar) वाहन क्रमांक टि.एस. ३१ जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी जिल्हा - चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असुन अधिक तपास सुरू असून आत्तापर्यंतच्या तपासात काळया रंगाची एक थारचार चाकी वाहन क्रमांक टि. एस. ३१ जे. २२९९ किमंत १४,००००० /- रु तसेच एक काळ्या रंगाची स्प्रे बॉटल किमंत २०० /- रू. असा माल जप्त करण्यात आला आहे. 

        गुन्हे शोध पथक येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळ्या रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे करीत अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आले.

        सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो. नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा / ०९ सिडाम, पोहवा / २२९६ रजनिकांत, पोहवा / ११७६ किशोर, पोहवा / २२७३ शरद पोहवा / ५३२ सतिश, पोहवा / ११६५ आनंद, पोहवा / २४५४ प्रशांत, नापोशि/ २४३० लालु, पोशि/ ८२५ हिरालाल, पोशि/ ८४७ रविकुमार, पोशि/ ८८७ प्रफुल, पोशि/ ८८१ संदिप, पोशि/ २५१३ विकास, पोशि/ ६९९ विकास जाधव, पोशि/ १२३० पंकज, मपोहवा / ४६२ मोरे पोलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि/ छगन, पोशि/ वैभव, पोशि/ भास्कर, पोशि/ राहुल, पोशि/ उमेश सहकार्याने कार्यवाही केली आहे. (chandrapur police) (In just 10 days, Chandrapur Police A. T. M. Hyderabad taken for others)

To Top