रेती तस्करांवर पोलिसांची धाड ; सहा आरोपी समेत 1 कोटी 83 लाखाचा मुद्देमाल जप्त !

 

गडचांदूर, जिवती, आंबेझरी, पाटण, शेणगाव, लाठी येथील रेती तस्करांचे दणाणले धाबे !

महावाणी - विरेंद्र पुणेकर
०५ मार्च २४

चंद्रपूर/कोरपना :  तालुक्यात नांदा फाटा बसस्थानकासमोर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पी. आय महेश कोंडावार PI Mahesh Kondawar यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा मारून 6 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 4 हायवा ट्रक असा एकूण 1 कोटी 83 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार, 1 मार्च रोजी सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास करण्यात आली.  Nanda Phata

        रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात रेती तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाळू तस्करीमुळे गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. रेती तस्करीत खून, धमकावणे, मारहाण आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय महेश कोंडावार यांना कोरपना तालुक्यातील नारंडा बस्थानकासमोर 'हायवा ट्रक' मधून रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून त्यांनी एक पथक तयार करून घटनास्थळ गाठले. कारवाईसाठी सापळा रचला. हायवा ट्रक पाहून कारवाई करण्यात आली. कारवाईत संजय निवृत्ती देवकाते (50) Nivritti Devakate रा. जिवती, अंबादास राजू आत्राम (30) Ambadas Raju Atram रा. अंबेझरी, सूरज प्रभाकर कुमरे (28) Suraj Prabhakar Kumar रा. लाठी, अशोक धर्मराज राठोड (26) Suraj Prabhakar Kumar रा. पाटण, यांचा समावेश आहे. सट्टाम वजीर शेख Suraj Prabhakar Kumar, रा. शेणगाव, सचिन भोयर Sachin Bhoyer, रा. गडचांदूर आदींना अटक केली आहे. Gadchandur

      चार ट्रक जप्त करून पोलिसांनी आरोपींकडून ट्रक क्रमांक एम. एच. 34 बी. जी. 9520, एम. एच. 34 बी. झेड. 0221, एम. एच 34 बी. झेड. 5773, एम. एच. 34 बी. झेड 9310 असा एकूण 1 कोटी 83 लाख 20 हजार रेतीसाठा माल जप्त केला आहे. पोलिसांनी 6 आरोपींना कोरपना पोलिसांच्या ताव्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, एल. सी. बी पी. आय कोडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिसांनी केली. #mahawani #chandrapurpolice #korpana #Superintendent of Police Mumakka Sudarshan

To Top