शिवसेना भा. कामगार संघटनेचे विद्युत कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला जाहीर समर्थन !

Mahawani

 

सदर मागण्या रास्त असून शासनाच्या निदर्शात आणू : चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची ग्वाही...

महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ मार्च २४

चंद्रपूर : विद्युत कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी आज 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले असून सदर आंदोलनामध्ये मार्गदर्शक म्हणून शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी santosh parkhi यांना आमंत्रित करण्यात आले होते ह्याशनी त्यांनी सदर मागण्या रास्त असून शासनाच्या निदर्शात आणून मागण्या त्वरित मान्य करण्याचे निवेदन मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांना Eknathji Shinde देणार असे मत व्यक्त केले. 30 percent wage hike for electrical contract workers

        महानिर्मिती, महावितरण व महापारेषण Maha Nirmidhi, Mahavitaran and Maha Pareshan या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून अविरत आपली सेवा देत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली. Chandrapur District President of Shiv Sena Indian Labor Union Santosh Parkhi

    कृती समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली असून आज 5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. आणि जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. अशा भूमिकेवर कामगार ठाम आहेत. Maharashtra State Electricity Board Contract Labor Union Joint Action Committee #mahawani #chandrapur #shivsena

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top