उप विभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर व पो. स्टेशन रामनगर यांची संयुक्त कारवाई.

Mahawani

 

अवैधरित्या ५ टन गोवंशाचे कापलेले मास व टाटा कंपनीचे वाहन जप्त करत दोन आरोपी जेलबंद.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१८ मार्च २०२४

चंद्रपूर : जिल्ह्यात होतअसलेल्या अवैध व्यवसाय, गोतस्करीवर कडक कारवाई करन्याचे मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस विभागाला निर्देश दिल्याने संपूर्ण पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून अवैध व्यावसाईकांवर नजरा गळून बसले आहे. 

        मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या निर्देशाची अंमलबजावणी करत उप विभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांना गुप्त बातमिदारा कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून वरोरा नाका चंद्रपुर (Varora Naka Chandrapur) या ठिकानी नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवन्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकाने पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळ लागला व धोकादायक रित्या वाहन चालवत असता त्यास रोड ब्लॉक करुन थांबवुन सदर वाहनाची पाहनी केली असता वाहनामध्ये प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे / गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे बर्फात ठेवलेले दिसून आले.  

        यावरून टाटा कंपनीचे १९९२ (ट्याम्पो) क्र.  MH 40 CT 2069 वाहनातील कापलेले मास व शरीराचे तुकडे जनावरांचे / गोवंशाची कत्तल करुन वाहतुक करत असल्याची प्रथमदशर्नी खात्री झाल्याने वाहनातील प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे / गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे अंदाजे वजन ५ टन ( ५,००० किलो ) पंचनाम्या प्रमाने अंदाजे किंमत १०,००,०००/-रू व टाटा कंपनीचे १११२ (ट्याम्पो) किंमती अंदाजे १५,००,०००/ असा एकुण २५,००,०००/- रू चा माल पंचनाम्याप्रमाने जप्त करुन चालक मोहम्मद राफे कुरेशी (Mohammad Rafe Qureshi), (१९), रा. भाजीमंडी कामठी, नागपुर व इशाद बबलु टांडी (Ishaad Bablu Tandi) (२०), रा.यशोधरा नगर कामठी, नागपुर यांचे विरूध्द पो. स्टे. रामनगर येथे अप.क्र. २८७ / २०२४ कलम ४२९ भादवि, सहकलम ५(क), ६, ९,११ महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३,१३० / १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        सदर कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव (Sudhakar Yadav) चंद्रपूर, पोलीस निरीक्षक सुनील गाडे (Sunil Gade) पो. उप. नि. अतुल कावळे (Atul Kawle), पो ना / २४३० लालु यादव पोशि/ ट विकास, चालक पो हवा / ब.नं. १३१५, पोशि/ ट मिलींद, पोशि/ १४०० वावळे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे. (chandrapurpolice) (mahawani) (Illegal smuggling of beef)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top