पोलीस स्टेशन राजूराच्या वतीने जनजागृतीक कार्यक्रम.


वाहतुक नियमा संधर्भात निबंध स्पर्धेचे आयोजन व पारितोषीक वितरन

निबंध स्पर्धेत एकुण 36 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२२  फेब्रुवारी २४

राजुरा : मागील काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयात रस्ते अपघाताच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाले असुन यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यु तसेच काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा आलेले आहे. वाढते अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरीता शालेय विद्यार्थ्यांकडुन पालकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस स्टेशन राजुराचे पोलीस निरीक्षक श्री. योगेश्वर पारधी यांच्या संकल्पनेतुन दिनांक 20 फेब्रुवारी रोजी न्यु ईरा इंग्लीश पब्लीक हायस्कुल राजुरा येथील इयत्ता 5 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता “मी पोलीस झालो तर” (If I become a policeman) व इयत्ता 8 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता “वाहतुकीचे नियम” (Traffic rules) तसेच वाढत्या अपघातांचे प्रमाण रोखण्याकरीता काय उपाययोजना करावी. या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धेकरीता एकुण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (New Era English Public High School Rajura)

आज 22 फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य पटकाविणारे इयत्ता 8 ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी कु. हिर आलाम, कु. सलोनी चौधरी, कु. नंदिनी आत्राम तसेच इयत्ता 5 ते 7 वी पर्यंतचे विद्यार्थी चैताली गोप, समृध्दी भेंडारे, साहिल शेख यांना पोलीस निरीक्षक श्री. योगेश्वर पारधी (Police Inspector Mr. Yogeshwar Pardhi) यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय असे प्रोत्साहनार्थ पारितोषीक वितरीत करण्यात आले. या जनजागृतीपर बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगिता वानखेडे मॅडम, प्रास्ताविक पोलीस हवालदार कैलास आलाम (Police Constable Kailas Alam) व आभार प्रदर्शन सना शेख मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाकरीता न्यु ईरा इंग्लीश पब्लीक हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. त्र्यंबक गंगशेट्टीवार (Mr. Trimbak Gangshettywar), सहाय्यक शिक्षिका नमीता वाटेकर मॅडम संपुर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच पोलीस स्टेशन राजुराचे पोलीस हवालदार सचिन पडवे यांचे विशेष सहकार्य लाभले. (New Era English Public High School) (rajura police) (mahawani)

To Top