कपास खरेदी विना वाहनांची जिनिंग समोर एकच रांग.

 

बबनभाऊ उरकुडे यांचे शेतकऱ्या समेत जिनिंग विरोधात रस्ता रोको आंदोलन !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ फेब्रुवारी २४

राजुरा : सिसीआई  (CCI) अंतर्गत होत असलेल्या कपास खरेदीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार ०५ फेब्रुवारी पासून गडचांदूर-राजुरा मार्गांवर असलेल्या गणेश व किसान जिनिंग समोर कपास भरल्या वाहनांची एकच रांग लागली असल्याने जिनिंग मालकाला याचे कारण विचारले असता जिनिंगच्या आवारात कपास खाली करण्यासाठी जागा अपुरी असल्याची कारणे देत दोन दिवसापासून वाहन खाली करण्यास नकार देत कपास भरले वाहन जिनिंग समोर रोकण्यात आले होते.

कालपासून वाहन खाली होत नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने त्रस्त शेतकऱ्यांने जिनिंग मालकाला कपास खाली करण्या करिता विनंती केली परंतु विनंतीला यश नमिळाल्याने (shivsena) शिवसेना नेते बबनभाऊ उरकुडे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. बबनभाऊ उरकुडे (baban urkude) यांनी सदर विषयाची तात्काळ दखल घेत जिनिंग समोर शेतकऱ्यांना सोबत घेत जिनिंग विरोधात रस्ता रोको आंदोलनाला सुरवात केली आंदोलनाने सुमारे एक ते दीड तास दोन्ही बाजूने वाहतून रोकून धरत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला सदर विषयाची माहिती दिली असता बाजार समिती कडून उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आले. तब्बल दिळ-दोन तास वाहतुकीची कोंडी झाल्याने त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती समझून घेत सिसीआई खरेदी अधिकाऱ्याला कोरपना इथून बोलवत रांगेतील वाहना पैकी 15 वाहन किसान जिनिंग येथे तर 17-18 वाहन गणेश जिनिंग येथे खाली करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलनाला पूर्णविराम देण्यात आला.

कालपासून कपास भरून रांगेत थांबलेले वाहन खाली झाल्याने शेकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शाखाप्रमुख सुरज नक्कावार, पत्रकार प्रवीण मेकर्तीवार आणि शेतकरी उपस्थित होते.


  • लोकप्रतिनिधी, आमदार फक्त मतांच्या राजकारणासाठी गावोगावी फिरतात परंतु शेकऱ्यांच्या प्रश्नांन कडे कोणाचेही लक्ष नाही. -बबन उरकुडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाउपाध्यक्ष 

  • बबनभाऊ धावून आल्याने आमच्या जिनिंग समोर दोन दिवसापासून कपास भरून उभ्या असलेल्या गाड्या खाली झाल्या -शेतकरी ,कापस विक्री करिता आलेले.



To Top