झोपेत पत्नीची कुल्हडीने निर्घृण हत्त्या !

Mahawani

काळोख्या रात्री घरी पत्नीला एकटी झोपलेल्या अवस्थेत पाहता पतीने केली आपल्याच पत्नीची कुल्हडीने निर्घृण हत्या.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ फेब्रुवारी २४

गोंडपिंपरी/वेळगाव : काळोख्या रात्री घरी पत्नीला एकटी झोपलेल्या अवस्थेत पाहता पतीने केली आपल्याच पत्नीची कुल्हडीने निर्घृण हत्या. लता दामोदर धुडसे (४०) (Lata Damodar Dhudse) असे मृत महिलेचे नाव आहे. गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी मृतक लता धूडसे यांचे दोन्ही मुले वाहनात कापूस भरण्यासाठी गेली होती मध्यरात्री दोनच्या सुमारास काम आटपून घरी परतले असता त्यांची आई ही रक्तात नाहून पडली होती. घटनास्थळी रक्ताने रंगलेली कुऱ्हाड देखील पडली होती. सदर दृश्य पाहता काळजी पोटी वडीलांचा शोध घेतला असता वडील कुठे दिसून आले नाही. हे पाहता वडिलाने हत्त्या करून पड काढले असल्याचे निदर्शनास आले आहे. पत्नीवर पती दामोधर मारोती धुडसे (50) (Damodhar Maroti Dhudse) यांनी कुऱ्हाडीने घाव करून निर्घृण हत्या केल्याचां अंदाज बांदला जात असून सदर घटनेची माहिती लाठी पोलिसांना गावकऱ्यां कडून कळता पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह समोरील तपासणीसाठी रवाना केला आहे. आरोपीचा शोध लाठी पोलीस घेत आहे. हत्तेचे कारण अद्याप कळालेले नसून पोलीस समोरील तपास करत आहे. व चंद्रपूर जिल्ह्याचे नव-नियुक्त पोलीस अधीक्षक मुंमका सुदर्शन (S.P. Mummka Sudarshan) घटनास्थळी पोहचून पाहणी केली आहे. (Brutally murders his wife with an ax in her sleep) (mahawani) (gondpipari) (chandrapur)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top