सिध्दार्थ स्पोटिंग क्लब ग्राउंड बाबुपेठ चंद्रपूर येथे मा. सुबोधभाऊ चिकटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन
१३ जानेवारी २४
चंद्रपूर : बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठीच्या विद्यमाने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले 9 जानेवारी फातिमा शेख, 12 जानेवारी राष्ट्रमाता माँ. जिजाऊ जयंती संयुक्त सोहळा काल 12 जानेवारी 2024 सिध्दार्थ स्पोटिंग क्लब ग्राउंड बाबुपेठ चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशबाबु डोंगरे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती आंदोलन (National President Bahujan Mukti Andolan), उद्घाटक नामदेव धनविजय, सहउद्घाटक मिंटुम दत्ता, दिपप्रज्वलन उमेश गेडाम, निलेंद्र मेश्राम. हे होतें, मुख्य मार्गदर्शक आभिलाषा गावतुरे, नियाज खान, वैशाली टोंगे, हंसराज कुंभारे, आदि उपस्थित होते.
अध्यक्षीय संबोधनात सुरेश डोंगरे, यांनी माँ. सावित्रीबाई फुले, माँ. फातिमा शेख, राष्ट्रमाता माँ. जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महिलांनी क्रांतीज्योती माँ. सावित्रीबाई फुले, माँ. फातिमा शेख, राष्ट्रमाता माँ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले ह्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका असून ज्या पद्दतीने माँ. फातिमा शेख यांनी आपल्या जीवन काळात मोठे कष्ट सहन करत क्रांतीज्योती माँ. सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले त्यांचे आदर्श घेत आज युवक/युवतींनी कसून शिक्षण घायला हवे आणि त्यांच्या जीवनावर लिहलेल्या पुस्तके आवर्जून वाचन करावेत.
सायंकाळी 6 ते 10 देशातील गाजलेल्या नामवंत गायकाद्वारा सादर गीत गायंनाचा महासंग्राम पार पडला गायक- क्रांतिमिनल, सुभाष कोठारे, भिमेश भारती, राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सुप्रसिद्ध गायक टि. व्ही व रेडिओ सिंगर, नागपूर यांच्या माध्यमातून तिंन ही, महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रबोधन संदेश देण्यात आला कार्यक्रमाला बाबुपेठ येथील हजारोच्या संखेने लोक उपस्थित होते. सुत्रसंचलन- रेवनाथ वालदे, भगिरथ वाकडे आयोजक समिती- सरोज भडके, खुशी दुसाने, काजल शुक्ला, वैशाली रामटेके, भारती धुर्मकेत, सीमाताई डोंगरे, रिना डोंगरे, नाजिया शेख, योगिता उराडे. बहुजन मुक्ती आंदोलन जिल्हा अध्यक्ष सुबोधजी चिकटे यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. (babupet) (chandrapur) (mahawani) (National President Bahujan Mukti Andolan)