०७ जानेवारी २४
चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील थिप्पा, मांगलहीरा,व उमरहीरा या गावातील सामुहीक वन हक्क प्राप्त गावात सामुहीक वन हक्क व्यवस्थापन समित्यांना बँक पासबुकचे वितरण कोरपनाचे तहसीलदार रंजित यादव यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. थिप्पा येथे घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी माने, गटविकास अधिकारी विजय पेंदाम (Vijay Pendam), नायब तहसीलदार प्रवीण चिडे, डॉ.शालिनी तरोने,सरपंच ज्योतिराम कोहचाळे,पोलीस पाटील जुगदराव कोरांगे,मारोती कोरांगे व प्रशासनातील अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री जनमन कार्यक्रमामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांना बँक खाते पासबुक तहसीलदार रणजित यादव (Tehsildar Ranjit Yadav) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्काची मान्यता) २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अंतर्गत सामुहीक वन हक्क प्राप्त झालेला असून या अंतर्गत संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी सामुहीक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे गठन करण्यात आले आहे.यावेळी पेसा भोयर, एफ. ई.एस.च्या फिल्ड ट्रेनर सुषमा पोटे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (korpana ) ( mahawani ) (Distribution of Bank Account Book to Collective Forest Rights Management Committee by Tehsildars at Thippa)