स्विम्याथॉन जलतरण स्पर्धेत ओवी पिदुरकर प्रथम

Mahawani

महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ जानेवारी २४

चंद्रपूर : गुजरात राज्यातील पोरबंदर येथे  ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या स्वीम्याथॉन-२०२४ या (जलतरण) स्पर्धेत समुद्रात ५ किलोमीटर पोहण्याच्या शर्यतीत चंद्रपूर येथील ओवी प्रवीण पिदूरकर (वय _९ वर्ष) हिने प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा उंचावर नेले आहे. ओवी ही सध्या चंद्रपूर येथील कारमेल अकॅडमीत  वर्ग ३ मध्ये शिकत आहे. लहानपणापासूनच ती अभ्यासात अत्यंत कुशाग्र असून तिला विशेष पोहण्याची आवड असल्याने ओविने जलतरण स्पर्धेत खूप मेहनत घेतली आहे. ओविचे वडील प्रवीण पिदूरकर व आई सुचिता पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात तिचे प्रशिक्षक महेंद्र कपूर (कोच) तसेच तिची मोठी बहीण पारुल प्रवीण पिदूरकर यांचे कडून तिने जलतरण स्पर्धेचे धडे घेतले आहे. शाळेतील अभ्यास सांभाळून ओवी (Ovi Pidurkar) स्वतः यासाठी दिवसातून दोन ते तीन तास पोहण्याच्या सरावाला वेळ देत असून तिच्या या यशाबद्दल ओवीचे मामा राजेंद्र पिंपळशेंडे, योगिता पिंपळशेंडे, हेमंत पिंपळशेंडे, पूनम पिंपळशेंडे व मित्र परिवाराने तिचे अभिनंदन केले आहे. ( chandrapur) (mahawani) (Ovi Pidurkar first in Swimathon swimming competition)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top