बंदुकीच्या बळावर पेट्रोल पंपातील लाखोची रोख रक्कम लप्पास


अवघ्या 10 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या: 5 आरोपी अटकेत


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ जानेवारी २४

राजुरा : राजुरा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील राजुरा-आसिफाबाद मार्गावरील वरूर रोड साईकृपा पेट्रोल पंप येथे आज 6 जानेवारी पहाटे ४ च्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवित घातला दरोडा. चित्रपटातील दृष्या सारखे तोंडाला डूपट्टे गुंडाळूनपेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकी व धार-धार शास्त्राचा धाक देत लोखंडी तिजोरीतून 1 लाख 93 हजार 853 रूपये केले लप्पास. कार्यालयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांचीच मोटारसायकल व मोबाईल घेत काढला पळ साईकृपा पेट्रोल पंप विरूर स्टेशन पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असून पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक देत कपाटातील लाखोच्या रक्कमेवर मारला डल्ला. 

सदर घटनेची माहिती कळताच स्तानिक पोलिसांनी चोहीकडे नाकाबंदी करत सदर घटनेची माहिती लगेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना दिली असता काही क्षणात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देत चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस स्थानकातून वेग-वेगळे पथक नेमूत आरोपींचा ताबडतोब शोध घेत अवघ्या १० तासात मारोती सुरेश शेरकुरे 31, दीपक शंकर देवगडे  22, नंदकिशोर रवींद्र देवगडे 19, रा. पारधीगुडा, महेश बाबू देवगडे 22, रा. धोपटाळा, अभिषेक दत्तू काळे 20 रा. खैरगाव यांना अटक करत आरोपींकडून मुद्देमालापैकी 56 हजार रुपये केले जप्त.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. रविंद्रसिंह परदेशी (Dr. Ravindra Singh Pardeshi), अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू (Reena Janbandhu), उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार ( Mahesh Kondawar), राजुरा पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, सपोनि धर्मेंद्र जोशी, सपोनि संतोष वाकडे, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे व पथक, सपोनि विकास गायकवाड पोलीस स्टेशन कोठारी व त्यांचे पथक, सपोनि किशोर शेरकी उपपोलीस स्टेशन उमरी पोतदार व त्यांचे पथक यांनी केली. पोलिसांनी आरोपीं विरुद्ध कलम 395, 398 अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील तपास विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल ( Jaiprakash Nirmal ) करीत आहे. (mahawani) (rajura)

To Top