प्रजासत्ताक भारताचे नागरीक असल्याचा अभिमान बाळगा -आमदार सुभाष धोटे

Mahawani


इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२६ जानेवारी २४

राजुरा : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, बी. एस्सी. नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७.४५ वाजता संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर केले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक प्रदिर्घ संघर्षांनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने जगातील सर्वात मोठे व सक्षम असे संविधान देशासाठी तयार व लागू केले. ज्यामुळे विविधतेने नटलेला भारत एकसंघ राहून एका महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे प्रजासत्ताक भारताचे नागरीक असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयांनी बाळगला पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

          या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर  गीत, नृत्य, भाषण, कराटे, लेझीम, पथनाट्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका आणि शालेय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये विजयी विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. 

            या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजित धोटे, कल्याण कॉलेज ऑफ बी. एस्सी नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्राचार्य समिर पठाण, इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्या चौधरी, राम मेडपल्लीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षा बरडे यांनी केले. (rajura) (Be proud to be a citizen of the Republic of India - MP Subhash Dhote) (mahawani) (Republic day 2024)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top