महामंडळच्या बसची पार्किंग मधल्या वाहनांना धडक

पार्किंग मधील वाहनांचे, मार्गावरील बॅरिकेट्स, विजेच्या खांबाचे मोठे नुकशान

महावाणि - विरेंद्र पुणेकर 
२६ जानेवारी २४

बल्लारपूर : आज देशभर प्रजासक्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सर्व नागरिक मोठ्या उल्हासात आहे. तसेच आजच्या आनंदाच्या दिनी नागरिक आपल्या व आपल्या परिवाराला गोळ-धोळ खाऊ घालण्या करीत बाजारात जास्त प्रमाणात येत असल्याने सर्व बाजारपेठ गजबजलेली असते. त्यात सुसाट सुटलेल्या महामंडळाच्या जीर्ण झालेल्या बसने (MH-40 N8986) जुना बसस्टॅन्ड, गांधी कॉम्प्लेक्स बल्लापूर येथे नगरपरिषदेच्या वाहन पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत पार्किंग मधील वाहनांचे जबर नुकसान केले आहे. सदर घटना दुपार ४:२० च्या दरम्यान घडली असून दुर्घटनेमध्ये कुठली जीवित हानी झाली नाही. परंतु पार्किंग मधील वाहनांचे मार्गावरील बॅरिकेट्स, विजेच्या खांबाचे मोठे नुकशान केले आहे. सदर बस संपूर्ण पणे जीर्ण झाली असून बसचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (PUC) वैधता संपली असून गाडी रोड वर धावण्या योग्य नाही. तरी हि महामंडळ जीर्ण झालेले वाहन वाहनचालकाला देत त्याचा व नागरिकांचा जीव धोक्यात घातलं असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक माध्यमाशी बोलताना सांगत आहे. (A corporation bus collided with vehicles in the parking lot) (BALLARPUR) (mahawani) (ST mahamandal) ( vahtuk vibhag)

To Top